शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची दिरंगाई उठली चिमुकलीच्या जीवावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:45 IST

नायगावातील संजय नगरातील एक पाच वर्षीय  चिमुकली शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाल्यानंतर अकोट  फैल ठाण्यात आलेल्या तिच्या आई-वडिलांना मुलीला  शोधण्याचा सल्ला देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यास  दिरंगाई केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.  अकोट फैल पोलीस ठाण्यात दुसर्‍यांदा हा प्रकार घडल्याने  पोलिसांची दिरंगाईच चिमुकलीच्या जीवावर उठल्याची चर्चा  संपूर्ण पोलीस वतरुळात सुरू आहे.

ठळक मुद्देअकोला पोलिसांची लक्तरे वेशीलाखुलेआम खून अन् दरोड्यांचे सत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नायगावातील संजय नगरातील एक पाच वर्षीय  चिमुकली शुक्रवारी सायंकाळी बेपत्ता झाल्यानंतर अकोट  फैल ठाण्यात आलेल्या तिच्या आई-वडिलांना मुलीला  शोधण्याचा सल्ला देऊन अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यास  दिरंगाई केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.  अकोट फैल पोलीस ठाण्यात दुसर्‍यांदा हा प्रकार घडल्याने  पोलिसांची दिरंगाईच चिमुकलीच्या जीवावर उठल्याची चर्चा  संपूर्ण पोलीस वतरुळात सुरू आहे. कुठलीही १८ वर्षाखालील मुलगी-मुलगा बेपत्ता झाल्यास  बेपत्ता झाल्याची तक्रार न घेता तातडीने अपहरणाचा गुन्हा  दाखल करून एक पथक गठित करावे आणि तातडीने अ पहरण झालेल्या अल्पवयीन मुलगा-मुलीचा शोध घेण्याचे  आदेश सर्वोच्च न्यायालयाचे आहेत; मात्र असे असतानाही  आलिया परवीन ही चिमुकली शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी बेपत्ता  झाली. तिचे अशिक्षित आई-वडील तक्रार देण्यास आले; मात्र  अकोट फैल पोलिसांनी त्यांनाच मुलीला शोधण्याचा सल्ला  देऊन प्रकरणात टोलवा-टोलवी केल्याचा आरोप मुलीच्या  िपत्याने केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने शोध घेतला असता  तर मुलीचे प्राण वाचले असते, असेही समोर येत आहे. या  हत्याकांडाला आता चार दिवस उलटले व पोलिसांनी गुन्हा  दाखल करून दोन दिवस उलटले; मात्र त्यानंतरही अकोट  फैल पोलीस अंधारात तीर मारत आहेत. गरीब व अशिक्षित असलेल्या तिच्या आई-वडिलांना  पोलिसांनी तातडीने सहकार्य केले असते तर परिस्थिती  वेगळी असती, अशी अपेक्षा तिच्या आई-वडिलांनी केली  आहे; मात्र पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्याने मुलीची  अशा प्रकारे निर्मम हत्या झाल्याचाही आरोप त्यांनी केला  आहे. 

पोलिसिंग एवढी सुस्त का?या चिमुकलीच्या हत्याकांडासोबतच चोर्‍यांचे सत्र, दरोडे व  खंडणीखोरांचा हैदोस जोरात सुरू आहे. तत्कालीन पोलीस  अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी निर्माण केलेला पोलिसांचा  दरारा त्यांची बदली होताच गुंड व चोरट्यांनी पायदळी  तुडविला आहे; मात्र त्यानंतरही पोलीस यंत्रणा एवढी सुस्त  का, असा सवाल सामान्य व्यक्तींकडून करण्यात येत आहे.  पाच वर्षीय चिमुकलीचा मृतदेह बघून हजारोंची मने  हेलावली. पोलिसांकडूनही तीव्र संताप व्यक्त करण्यात  आला; मात्र तिचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत.अकोला पोलिसांच्या इतिहासात हुक्का पार्लरचा पर्दाफाश  पहिल्यांदा झाला. यावरून अवैध धंदे कशा प्रकारे वाढले, हे  दिसून येते. ज्या परिसरात चिमुकलीचे हत्याकांड घडले,  त्याच परिसरात मोठे धंदेही सुरू असल्याचे वृत्त आहे.