शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चौकीही भुईसपाट!

By admin | Updated: March 5, 2017 01:49 IST

चौथ्या दिवशीही अकोटात राबविली अतिक्रमण हटाव मोहीम.

अकोट, दि. ४- अकोट-अंजनगाव मार्गावर असलेल्या अतिक्रमणामधील अकोट शहर पोलीस स्टेशनची पोलीस चौकी ४ मार्च रोजी राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत भुईसपाट करण्यात आली. गत चार दिवसांपासून या मार्गावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये चौपदरीकरणाकरिता रस्त्याच्या आड येत असलेली अतिक्रमणे पाडण्यात येत आहेत. आतापर्यंत ७५ च्यावर घरे पाडण्यात आली असून, किरकोळ अतिक्रमणसुद्धा पाडण्यात आले आहे. नगर परिषदेपासून खाई नदीच्या पुलापर्यंंत या मार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. त्याकरिता नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. यामध्ये शनिवारी उर्दू शाळेसमोरील धारुळी वेसवर पक्के बांधकाम केलेली पोलीस चौकीसुद्धा भुईसपाट करण्यात आली. या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमण पाडण्यात आल्याने रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात मलबा पडला आहे. काही घरे व पक्क्या इमारतींसमोरील भाग पाडण्यात आला आहे. शिवाय, अतिक्रमण पाडल्यानंतर पाणीपुरवठय़ाची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ही मोहीम अजूनही तीन ते चार दिवस सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. अतिक्रमण हटाव मोहीम मुख्याधिकारी गीता ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता घुमरे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत असून, मोहिमेमध्ये कार्यालय पर्यवेक्षक मयूरी जोशी, आरोग्य निरीक्षक प्रदीप रावणकार, गजानन महल्ले, मोहन नाथे, न.पा. अभियंता स्नेहल बोमकंटीवार, संजय अढाऊ आदींसह विविध विभागाचे कर्मचारी हजर होते. पक्की अतिक्रमणे अर्धवट पाडली अंजनगाव मार्गावरील गोरगरिबांची घरे पूर्णत: भुईसपाट करण्यात आली आहेत, त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. घरकुलेसुद्धा पाडण्यात आली आहेत. काही बिल्डर लॉबीने या मार्गावर पक्की बांधकामे करून दुकाने बांधली आहेत. नगर परिषदेची बांधकाम परवानगीसुद्धा घेण्यात आली नाही, अशी अतिक्रमणे मात्र अर्धवट स्थितीतच पाडण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या गरिबांची घरे पूर्णत: पाडण्यात आली. त्यांच्यामध्ये या मोहिमेतील धरसोडवृत्ती पाहून भेदभावाची भावना निर्माण होत आहे. प्रशासनाने कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता व भेदभाव न करता पारदर्शकपणे ही मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.