शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नवदुर्गा मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलीसांचा लाठीमार

By admin | Updated: October 13, 2016 03:11 IST

बोरगाव मंजू येथे पोलिसांचा अतिरेक; नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यात तणाव.

बोरगाव मंजू, दि. १२- येथे निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत रात्री १0 नंतर पोलिसांनी एका कार्यकर्त्याला मारहाण केल्यावरून तणाव निर्माण झाला होता. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणूक थांबवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचवेळी रॅपिड अँक्शन फोर्सच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी मिरवणुकीच्या स्थळीत येताच मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला यामध्ये तिन युवक जखमी झाले आहेत. बोरगाव मंजू येथे बुधवारी नवदुर्गा विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. विसर्जन मिरवणुकीदरम्यान रात्री १0 वाजता एका पोलिसाने मंडळाच्या कार्यकर्त्याला मारहाण केली. ही बाब मंडळाच्या इतर सदस्यांना माहिती होताच सर्वच मंडळाचे कार्यकर्ते संतप्त झाले. दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मिरवणूक थांबवण्यात आली. रात्री १२ वाजेपर्यंत ही मिरवणूक थांबलेली होती. तणाव वाढत असल्याने अकोल्यावरून अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली. अकोल्यावरून आलेल्या रॅपिड अँक्शन फोर्सच्या जवानांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करणे सुरू केले. त्यामध्ये बालु ढवळे, मयुर जयस्वाल, आयुष जयस्वाल हे तिन युवक जखमी झाले. या प्रकारामुळे मिरवणुकीचे वातावरण आणखी तणावग्रस्त झाले होते. ही माहिती मिळताचे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे आदींनी घटनास्थळावर धाव घेतली. काही कार्यकर्त्यांनी आमदार रणधीर सावरकरांना ही माहिती दिल्याने त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. दरम्यान, अधिकार्‍यांनी मंडळाच्या अध्यक्षांशी चर्चा करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याने मिरवणुकीला रात्री १२ वाजता पुन्हा सुरुवात झाली. पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप बालु ढवळे, मयुर जयस्वाल, आयुष जयस्वाल या तिन युवकांना पोलिसांच्या लाठयांचा जबार मार बसला. या युवकांची आमदार रणधीर सावरकर यांनी भेट घेतली असता पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याचा आरोप आ.सावरकर यांच्याकडे केला. या प्रकाराची आ.सावरकांनी दखल घेतली असुन पोलिसांना या प्रकाराचा जाब विचारला जाईल असे आश्‍वासन दिले. वृत्त लिहेपर्यंत दोनशे लोकांचा जमाव पोलिस स्टेशनवर तक्रार देण्यासाठी दाखल झाला होता.