शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विषबाधा : ‘त्या’ पदार्थांचे नमुने तपासणीसाठी पाठवले नागपूरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:09 IST

विषबाधा झालेल्या ग्रामस्थांच्या प्रकृतीत सुधारणा असून, त्यांनी सेवन केलेल्या जेवणाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे.

अकोला : भीमटेकडे येथे महाप्रसादाच्या जेवणातून १११ ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. विषबाधा झालेल्या ग्रामस्थांच्या प्रकृतीत सुधारणा असून, त्यांनी सेवन केलेल्या जेवणाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. हा अहवाल आल्यानंतरच विषबाधेचे नेमके कारण समोर येणार आहे.अकोट तालुक्यातील हिंगणी भीमटेकडी येथे रविवार, १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासोहब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात जेवण केल्यानंतर १११ ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. येथील रुग्णांना तत्काळ उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. योग्य वेळी उपचार झाल्याने त्या ग्रामस्थांचे प्राण वाचले. त्यांच्या प्रकृतित सुधारणा झाली असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली; परंतु ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचे कारण जाणून घेण्यासाठी जेवणात समाविष्ट प्रत्येक खाद्य पदार्थाचे नमुने घेण्यात आले आहेत. शिवाय, हे खाद्य पदार्थ निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या साहित्यांचे नमुने, तसेच रुग्णांच्या उलटीचे नमुनेदेखील घेण्यात आले आहेत. संकलीत नमुने पुढील तपासणीसाठी नागपूर येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांच्या तपासणी अहवालानंतरच विषबाधेचे नेमके कारण समोर येणार असल्याने, डॉक्टरांसोबत सर्वांनाच त्याची प्रतीक्षा आहे.सर्वच रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आली असून, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना रुग्णालयातून सुटी दिली जाईल. विषबाधेचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी खाद्यपदार्थांसह रुग्णांच्या उलटीचे नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. तपासणीचे अहवाल आल्यानंतरच वास्तव समोर येईल.- डॉ. श्याम सिरसाम, विभाग प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय