शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांने थांबविली शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: May 25, 2017 20:17 IST

तेल्हारा : तेल्हारा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची तालुक्यातील सर्वात मोठी मार्केट असून तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पादित माल या मार्केटमध्ये विक्रीकरिता आणतात.

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तेल्हारा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची तालुक्यातील सर्वात मोठी मार्केट असून तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पादित माल या मार्केटमध्ये विक्रीकरिता आणतात. आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून शेतकरी ट्रॅक्टर किंवा अन्य वाहनामध्ये माल विक्रीकरिता आणतात. वाहनांमधून येणाऱ्या धान्याचे मोजमाप स्वयंचलित भुईकाट्यावर केले जाते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून भुईकाट्यावर मोजमाप केलेल्या मालामधून प्रतिक्विंटल अर्धाकिलो लेस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या काटापट्टीतून कापल्या जाते. कृषी उत्पन्न बाजार समिती व पणन कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नसताना दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांकरवी शेतकऱ्यांची आर्थिक लूट मार्केटमध्ये सुरू होती. साधारणपणे एक ट्राली तुरीमध्ये एक हजार रुपये हरभऱ्याच्या ट्रालीमागे बाराशे रुपये तर सोयाबीनच्या ट्रालीमागे पाचशे रुपयाचे आर्थिक नुकसान या लेसमुळे शेतकऱ्यांना सहन करावे लागत असे. म्हणजे वर्षाकाळी लाखो रुपयाचे नुकसान बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे होत राहिले आहे. बाजार समितीमध्ये निवडून येणारे संचालक शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा आव आणत असले तरी या अन्यायाबद्दल एकाही संचालकाने याबद्दल आजपर्यंत एक चकार शब्दही काढला नाही, हे विशेष.युवाशक्ती संघटनेचे खापरखेड येथील जागरूक कार्यकर्ते व शेतकरी नारायण नामदेव भोकरे यांनी त्यांच्याकडील ासेयाबीन बाजार समितीमध्ये विक्रीस आणून महेश ट्रेडिंग कंपनीमार्फत विकले. त्यंच्या मालाच्या काटापट्टीतून प्रतिक्विंटल अर्धा किलो लेस संबंधित व्यापाऱ्याने कापल्यानंतर त्यांनी बाजार समितीकडे रितसर तक्रार दाखल करून बाजार समितीला धारेवर धरले. अखेर बाजार समितीला यावर योग्य पाऊल उचलने भाग पडले. यामुहे बाजार समितीने लेस घेण्यास प्रतिबंध करणारा आदेश काढून संबंधित व्यापाऱ्यावर नोटीसे बजावल्या. बाजार समितीला लेसला प्रतिबंधक करणारा फलक बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा लागला. नारायण भोकरे यांच्या जागरुकतेमुळे शेतकऱ्यांचे वर्षाकाठी लाखो रुपयाचे नुकसान थांबले आहे. नारायण भोकरे यांचे जागरुकतेबद्दल युवाशक्ती संघटनेचे भवानीप्रताप, उत्तम नळकांडे, विजय बोर्डे व वैभव पोटे यांनी त्यांचे कौतुक केले असून कुठल्याही व्यापाऱ्याने काटापट्टीतून लेस कापल्यास बाजार समितीकडे तक्रार करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.