शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लाझ्मा थेरपी’ला नियमांचे अडथळेच जास्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 10:22 IST

प्लाझ्मा दान करण्यासाठी दात्यांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने अनेक जण योग्य प्रतिसाद देत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असताना प्लाझ्मा थेरपीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे; मात्र किचकट प्रक्रियेमुळे बरे झालेल्या रुग्णांचे रक्त संकलनात आरोग्य विभागाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही जण प्लाझ्मा देण्यास तयारही आहेत; परंतु प्लाझ्मा दान करण्यासाठी दात्यांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने अनेक जण योग्य प्रतिसाद देत नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.कोरोनावर अद्यापही प्रभावी औषध आले नाही; परंतु प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचाराला मान्यता मिळाल्याने सर्वसामान्यांच्या आशा वाढल्या आहेत. सर्वोपचार रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरूदेखील झाली असून, आतापर्यंत कोरोनातून बरे झालेल्या तीन रुग्णांनी प्लाझ्मा दान केले. प्लाझ्मा दान करण्यासाठी जवळपास ४० बरे झालेल्या रुग्णांची यादी शासकीय रक्तपेढीने तयार केली आहे; परंतु किचकट प्रक्रियेमुळे प्लाझ्मासाठी रक्तसंकलनात आरोग्य यंत्रणेला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.यातील सर्वात मोठी अडचणी म्हणजे ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे होती, त्यांच्याच रक्तामधून प्लाझ्मा घेणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले; परंतु जिल्ह्यात आतापर्यंत दाखल बहुतांश रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेच नव्हती.त्यामुळे त्यांच्यात आवश्यक अ‍ॅन्टी बॉडिज विकसित झालेल्या नसल्याने त्याचा फायदा प्लाझ्मा थेरपीमध्ये शक्य नाही.

या आहेत समस्या

  •  बहुतांश रुग्णांना कोरोनाची लक्षणे नव्हती. त्यामुळे त्यांचे रक्त संकलन शक्य नाही.
  •  लक्षणे असणारे रुग्ण बरे झाल्यावर रक्तदान करण्यास तयार नाहीत.
  •  रुग्ण बरा झाल्यानंतर २८ दिवसांची करावी लागते प्रतीक्षा.
  •  बरे झालेल्या रुग्णांशी संपर्क साधण्यासाठी पर्याप्त मनुष्यबळ नाही.

अशी आहे प्लाझ्मा दान करण्याची प्रक्रिया कोरोनाची लक्षणे असणारा रुग्ण बरा होऊन २८ दिवसांनी प्लाझ्मा दान करू शकतो. त्यासाठी त्याला प्रथम टेस्टिंगसाठी बोलावले जाते. यामध्ये व्यक्तीचे वजन, हिमोग्लोबीन, प्लेटलेट्ससह इतर चाचण्या केल्या जातात. त्यानंतर दात्याला रक्तसंकलनासाठी पुन्हा बोलावले जाते.कोण करू शकतो प्लाझ्मा दान? ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे होती. हिमोग्लोबिन १२.५ असणे आवश्यक वजन ५० किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक १८ ते ६० वर्ष वयोगटातील रुग्ण

कोरोनाची लक्षणे असणारा रुग्ण बरा झाल्यावर २८ दिवसांनी त्याच्याकडून प्लाझ्मा संकलित करणे शक्य आहे; मात्र या उपचारपद्धतीसाठी काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. बरे झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा.- डॉ. श्रीराम चोपडे,विभाग प्रमुख, शासकीय ब्लड बँक, जीएमसी, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या