शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तीन मिनिटात केली ४ हजार वृक्ष लागवड

By admin | Updated: July 2, 2017 09:24 IST

अकोला जिल्ह्यातील उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला(जि. अकोला) : राज्य शासनाच्या ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत शिर्ला येथील शहीद कैलास निमकंडे वन उद्यानात तीन मिनिटात ४ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. शिर्ला येथील रेशीम विकास केंद्र, शहीद सैनिक भूमी, श्रीकांत पर्वत येथे एकूण ४ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. सर्व ठिकाणी विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. पिकासाठी एकवटलेल्या शिर्ला गावाचे हिरवे स्वप्न नक्कीच साकारेल. विकासासाठी जिल्हा प्रशासन सदैव आपल्या सोबत आहे, असे अभिवचन अकोला जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी यावेळी मार्गदर्शन करताना गावकऱ्यांना दिले. अकोला जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, बाळापूर विधानसभा आमदार बळीराम सिरस्कार, उपवनसंरक्षक विजय माने, बाळापूर एसडीओ प्रा. संजय खडसे, पातूर तहसीलदार आर. जी. पुरी, गटविकास अधिकारी शेखर शेलार, सभापती सविता धाडसे, रेंज फॉरेस्ट आॅफिसर जी. डी. देशमुख, भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे जनक ए. एस. नाथन, जिल्हा रेशीम अधिकारी संजय शिंदे, तालुका कृषी अधिकारी एस. एम. मकासरे, गटशिक्षणाधिकारी भटकर, स्टेट बँक आॅफ इंडियाचे कौस्तुभ, पाणी फाउंडेशनचे सुभाष नानोटे, प्रफुल्ल कोल्हे, सरपंच रिना संजय शिरसाट, ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, सुवर्ण नदी प्रकल्पाचे सचिन कोकाटे, प्रकाश अंधारे यांनी वृक्ष लागवड केली.शिर्ला गावाने हिरवागार शिर्ला करण्याचे स्वप्न पाहिले. ते पूर्ण करण्यासाठी तीन मिनिटात ४ हजार वृक्ष लागवड करण्याचा विक्रम गावाने केला. त्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. गावाने आज रेशीम विकास केंद्र, शहीद सैनिक भूमी, श्रीकांत पर्वत येथे एकूण ४ हजार वृक्ष लागवड करण्यात आली. सर्व ठिकाणी विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.शिर्ला वेगळी ओळख निर्माण करीत आहे - बळीराम सिरस्कारशिर्ला गाव विकासकामासाठी माझ्या मतदारसंघात ओळखले जाते. गावाने लावलेली ४ हजार झाडे जगवून त्याचा वाढदिवस पुढील वर्षी करावयाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी गाव यशस्वीपणे पार पाडेल, यात शंका नाही, असे सांगितले. यावेळी बाळापूर विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी ह्यझाडे लावा, झाडे जगवाह्ण या आशयाचे समूहगीत विद्यार्थ्यांकडून गाऊन घेतले. उपस्थित सर्वांनी साद घातली.