शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
4
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
5
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
6
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
7
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
8
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
9
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
10
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
11
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
12
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
13
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
14
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
15
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
16
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
17
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
18
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

दिवाळीसाठी अतिरिक्त बसेसचे नियोजन

By admin | Updated: October 15, 2014 00:18 IST

राज्यात १७,५५0 बसेस : अमरावती विभागात ८७५ बसेस.

वाशिम : दिवाळीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन, एस.टी. महामंडळाने अतिरिक्त बसेसचे नियोजन केले आहे. राज्यभरातून १७ हजार ५५0 अतिरिक्त बसेस दिवाळीदरम्यान धावणार असून, अमरावती विभागासाठी ८७५ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.दिवाळी आठ दिवसावर येऊन ठेपली आहे. शाळांना सुट्या लागल्या की, प्रवाशांची एकच गर्दी होते, हा दरवर्षीचा अनुभव आहे. या गर्दीमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि महामंडळाला अतिरिक्त उत्पन्न मिळावे, या दृष्टिकोनातून एस.टी. महामंडळ दरवर्षी अतिरिक्त बसेसचे नियोजन करीत असते. गतवर्षी दिवाळीनिमित्त राज्यभरातून १४ हजार ८६0 अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या; मात्र तरीही गर्दीमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावाच लागला होता. हा अनुभव लक्षात घेऊन, यावर्षी २६९0 बसेस वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी महामंडळाने ऑनलाईन आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. नागपूर प्रादेशिक विभागातून ७७५, अमरावती विभागातून ८७५, नाशिकमधून ३३७५, पूणे ४५७५, औरंगाबाद ४७00, मुंबई प्रादेशिक विभागातून ३२५0, अशा एकूण १७ हजार ५५0 अतिरिक्त बसेस प्रवाशांच्या सेवेत तैनात करण्यात आल्या आहेत. ही सेवा १६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरदरम्यान सुरू राहणार आहे. अमरावती विभागातील अकोला व वाशिम या दोन जिल्ह्यात ७५, अमरावती १५0, यवतमाळ १00 आणि बुलडाणा जिल्ह्यासाठी ५५0 अतिरिक्त बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी हाच आकडा २४0 होता. यामध्ये अमरावती जिल्ह्यात ४0, अकोला व वाशिम जिल्ह्यात ६0, बुलडाणा ८0 तर यवतमाळ जिल्ह्याला ६0 अतिरिक्त बसेस मिळाल्या होत्या. यावर्षी प्रवाशांची वाढती गर्दी गृहित धरून अतिरिक्त बसेसच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. १६ ऑक्टोबरपासून या अतिरिक्त बसेस प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत.अमरावती विभागातील अतिरिक्त बसेसचे नियोजनअकोला-वाशिम             ७५अमरावती                  १५0यवतमाळ                  १00बुलडाणा                    ५५0एकूण                        ८७५