शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कापसावर आता ‘पिठय़ा’चे आक्रमण !

By admin | Updated: October 8, 2014 01:10 IST

विदर्भातील कापसाच्या उत्पादनावर प्रश्नचिन्ह.

अकोला : हवामान बदलामुळे विदर्भातील कापूस, या नगदी पिकाला अगोदरच विविध रोगांनी ग्रासले असताना, आता या पिकावर पिठय़ा ढेकूण (मिली बग, फेनाकोकस सोलेनोप्सीस टींसले) या जहाल किडीने हल्ला केला असून, त्यामुळे काही प्रमाणात तग धरू न असलेल्या कापसाच्या उत् पादनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.यावर्षी पावसाला विलंब झाल्याने पेरण्यांना उशिर झाला. पेरण्या झाल्यांनतर ज्यावेळी पावसाची गरज होती, त्यावेळी पाऊस आला नाही. सप्टेंबर महिना संपताच ऑक्टोबर हिटचा परिणाम पिकावर जाणवू लागला आहे. या हवामान बदलामुळे किड, रोगांसाठी पोषक वातावरण तयार झाले असून, त्याचे व्यवस्थापन करताना शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पाऊस नसल्याने जमिनीतील ओलावा संपला असून, जमिनीला भेगा पडल्या आहेत. या संकटाचा सामना करीत असताना, आता नव्या रोगाचा सामना करावा तरी कसा, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या सर्वेक्षणातही विदर्भातील कापूस उत्पादक जिल्हयात पिठय़ा आढळून आला आहे. धुर्‍यावरील ही किड झपाट्याने सर्व शेतात पसरण्याची प्रक्रिया सुरू असल्याने, ग्रामस्तरावरील कृषी विस्तार कर्मचार्‍यांनी या किडीच्या प्रादुर्भावाविषयी स तर्क राहावे आणि शेतकर्‍यांनी शेतातील कपाशी पिकाचे नियमीत सर्वेक्षण करण्याचे आवाहन कृषी शास्त्रज्ञांनी केले आहे. या किडीची प्रौढ व त्यांची पिल्ले पानातील कोवळ्य़ा शेंड्यातील व फांदीतील पेशीमधून रस शोषण करतात. या किडीची प्रौढ व पिल्ले शरीरामधून साखरेच्या पाकासारखा गोड पदार्थ टाकीत असल्याने झाडावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे संपूर्ण झाड चिकट व काळसर होत असल्याने पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण निर्माण होते. परिणामी कापसाचे उत्पादनात घटते. त्यामुळे या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकर्‍यांनी उपाययोजना करण्याची गरज आहे. डॉ. पीडीकेव्हीचे किटकशास्त्रप्रमुख डॉ.डी.बी. उंदीरवाडे यांनी विदर्भातील कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कापसावर पिठय़ा ढेकूण या किडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे सांगून ग्रामस्तरावरील कृषी विस्तार कर्मचारी आणि शेतकर्‍यांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे. या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार किटकनाशकांची फवारणी करण्याचे त्यांनी अवाहन केले.