शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शेगावातील युवकांकडून पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2016 02:03 IST

दोन्ही युवक गजाआड; डझनावर पिस्तूल जप्त.

अकोला : शेगाववरून अकोल्यात पिस्तूल घेऊन येणार्‍या दोन युवकांना आकोटफैल पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. या दोघांनाही न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंंत पोलीस कोठडी सुनावली.शेगाव येथील ताडी परिसरातील अमोलसिंह रामसिंह राजपुत (३२) व पंचशील नगरमधील रहिवासी तानाजी महादेवराव चव्हाण (४१) हे दोघे एमएच २८-एके -६३२४ क्रमांकाच्या दुचाकीने अकोल्यात पिस्तूल घेउन येत असल्याची माहिती आकोटफैल पोलिसांना मिळाली. या माहितीवरून आकोटफैल पोलिसांनी आपातापा चौकामध्ये पाळत ठेवली. रविवारी रात्री उशीरा दुचाकीवर दोघे येताच आकोटफैल पोलिसांनी त्यांची झडती घेतली. यामध्ये या दोघांजवळ २0 हजार रुपये किमतीची एक पिस्तूल आढळली. या दोघांविरुध्द आकोटफैल पोलिसांनी आर्म्स अँक्टचे कलम ३, २५ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या दोन्ही आरोपींना सोमवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी स्वरुपकुमार बोस यांच्या न्यायालयाने ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आरोपीतर्फे अँड. केशव एच. गीरी व वैशाली गीरी यांनी कामकाज पाहीले. गत महिन्यातच शेगाव येथील रहिवासी राहुल शिवाजी शिरसाट व सुदर्शन उर्फ गोलू गोपाल उकर्डे या दोघांना आकोटफैल पोलिसांनी एक पिस्तूल व चार काडतूस घेउन येत असताना अटक केली होती.जवळपास २ वर्षात अकोल्यात डझनावर पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच २0 जिवंत काडतूसही जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. यावरून जिल्हयात पिस्तूल-खरेदी विक्रीची मोठी उलाढाल सुरु असल्याचे स्पष्ट होत असून हे रॅकेट आकोटफैलमधून चालविण्यात येत असल्याचेही मागील दोन कारवाईवरून उघड झाले आहे.