शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांपासून सुरू होता पिस्तूल तस्करीचा गोरखधंदा

By admin | Updated: September 1, 2014 01:40 IST

अकोल्यात चार वर्षांपासून सुरू होता पिस्तूल तस्करीचा गोरखधंदा.

नितीन गव्हाळे / अकोलापिस्तूल तस्करीप्रकरणी शनिवारी गजाआड केलेला अमोल साळवे (२५) याने चार वर्षांपूर्वी पिस्तूल, देशीकट्टा तस्करीचा गोरखधंदा सुरू केला. त्यासाठी त्याने नात्यातीलच मित्रमंडळींची टोळी करून, त्यांनाही पैशांचे आमिष दाखवून या गोरखधंद्यामध्ये आणल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शिवणीतील अमोल साळवे, उमेश जोंधळे, उमेश सोळंके, राजकुमार यादव, अमोल जामनिक, पवन गावंडे आणि राहुल शर्मा या सात जणांच्या टोळीला अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीच्या तीन पिस्तूल व दोन जिवंत काडतूस जप्त केले होते. या टोळीचा म्होरक्या अमोल साळवे हा असून, तो गुन्हेगारांच्या संपर्कात आल्याने, त्याचे अनेकदा मध्य प्रदेशात जाणे-येणे सुरू झाले. गुन्हेगारांना असलेली शस्त्रांची निकड पाहून, त्याने शस्त्र तस्करीची शक्कल लढविली आणि तस्करीच्या धंद्यात आपले पाय घट्ट रोवले. मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये फिरून त्याने तेथील शस्त्र विक्री करणार्‍या व्यक्तींसोबत ओळख निर्माण केली. संपर्क वाढवला. यातूनच त्याला ४ ते ५ हजार रुपयांमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल व देशीकट्टे मिळू लागले; परंतु हे शस्त्रे विकायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी त्याने लोहगडचा उमेश जोंधळे व कोळासा येथील उमेश सोळंके यांना हाताशी धरले. पुढे अमोल जामनिक याच्याकडे ग्राहक शोधून आणण्याचे काम दिले. तसेच शहरातील पवन गावंडे व राहुल शर्मा हेही त्याच्या संपर्कात आले. हे दोघे शस्त्र खरेदीमध्ये मध्यस्थ म्हणून साळवेसाठी काम करू लागले. साळवेने मध्य प्रदेशातून ४ ते ५ हजार रुपयांमध्ये आणलेले पिस्तूल व देशीकट्टे १0 ते २0 हजार रुपयांमध्ये विकून, त्यातून प्राप्त झालेल्या पैशांमधून आपले कमिशन या युवकांना मिळू लागल्याने, त्यांचाही जम बसला.*शस्त्र विक्रीच्या कमिशनमधून महागड्या मोटारसायकलीअमोल जामनिक व उमेश जोंधळे यांनी मिळत असलेल्या हजारो रुपयांच्या कमिशनमधून एक ते सव्वा लाख रुपये किमतीच्या मोटारसायकली घेतल्याचेही समोर आले. पोलिसांनी या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. उमेशच्या मोटारसायकलवर तर स्पेशल नंबर २११४ आहे. या आकड्यामधून ह्यशामह्ण नाव तयार होते. त्याने नंबरप्लेटवर २११४ आकड्यांचे अक्षरांमध्ये रूपांतर करून मोटारसायकलवर ह्यशामह्ण हे नाव टाकले आहे. *आरोपींकडून आणखी पिस्तूल मिळण्याची शक्यतापोलिस कोठडीदरम्यान आरोपी अमोल साळवे, उमेश जोंधळे, उमेश सोळंके व अमोल जामनिक यांच्याकडून आणखी पिस्तूल व देशीकट्टे मिळण्याची शक्यता आहे. गत चार वर्षांपासून सुरू असलेल्या या गोरखधंद्यामध्ये त्यांनी किती गुन्हेगारांनी पिस्तूल, देशीकट्टे व जिवंत काडतूस उपलब्ध करून दिले. याची माहितीही पोलिस घेणार आहेत. *आरोपींना २ सप्टेंबरपर्यंत कोठडीस्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय ज्ञानेश्‍वर फड यांनी सातही आरोपींना रविवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाकडे त्यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने आरोपींना २ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.