लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलजारपुरा भागातील रहिवासी असलेल्या एका वाहनाच्या चालकावर याच परिसरातील रहिवासी क्षुल्लक कारणावरून डोक्यावर लोखंडी पाइपने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सुमीत भास्कर देऊळकार हा त्याच्या मित्रासोबत शौचासाठी जात असताना त्याच्याशी ऋषभ बागडे आणि सिद्धार्थ बंडू मेश्राम या दोघांनी वाद घातला. त्यानंतर संगनमताने सुमीतच्या डोक्यावर लोखंडी पाइपने हल्ला चढविला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सुमीतला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. सुमीतच्या तक्रारीवरून डाबकी रोड पोलिसांनी सदर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चालकाच्या डोक्यावर पाइपने हल्ला
By admin | Updated: May 27, 2017 00:44 IST