शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पिंजर-निहिदा रस्त्याचे काम निकृष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:21 IST

निहिदा: गत तीन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पिंजर-निहीदा रस्त्याचे काम सुरू झाले; मात्र अवघ्या काही दिवसातच रस्त्यावरील डांबरीकरण ...

निहिदा: गत तीन वर्षांपासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पिंजर-निहीदा रस्त्याचे काम सुरू झाले; मात्र अवघ्या काही दिवसातच रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याने कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे नागरिकांना नाहक त्रासाला समारे जावे लागत आहे. रस्त्याच्या कामाबाबत निहिदा, बहिरखेड, लखमापूर येथील ग्रामस्थांनी तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पिंजर-निहिदा रस्त्याचे काम सुरू झाले असून, अद्यापही अपूर्णच आहे. रस्त्याचे झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने परिसरातील निहिदा, बहिरखेड, लखमापुर येथील ग्रामस्थांनी तक्रारी केल्या; मात्र कंत्राटदाराविरुद्ध कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. निकृष्ट काम होत असल्याने परिसरातील रस्त्याचे काम बंद पाडले असून, कंत्राटदाराने काम अपूर्ण करून साहित्य नेल्याचे चित्र आहे. रस्त्याच्या कामाबाबात कंत्राटदार राहुल सावजी यांना विचारणा केली असता ते अपमानास्पद वागणूक देऊन उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. काम केल्यानंतर काही दिवसातच निहिदा-सावरखेड फाट्यापर्यंत उखडले आहे. गत काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीच्या अनुराधा ठाकरे यांनी तक्रार देऊन विरोध केला होता. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन त्वरित दर्जेदार काम करण्याची मागणी निहिदाचे सरपंच मीना अविनाश ठाकरे, बहिरखेडचे सरपंच कविता किरण ठाकरे, पोलीस पाटील विजय ठाकरे, किरण ठाकरे, संतोष सोनटक्के, मनोज सोनटक्के यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.

-----------------------

निहिदा- पिंजर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून, याबाबत लवकरच कारवाई करण्यात येईल.

-नितीन नाकट, कार्यकारी अभियंता, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अकोला

डांबरीकरणाचे निकृष्ट झाल्याचे आरोप होत होते, त्यामुळे सद्या काम बंद आहे. आधी रिपेरिंगचे काम होईल, नंतर डांबरीकरण होईल.

- राहुल सावजी, कंत्राटदार अकोला

निहिदा- पिंजर रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याच्या अनेक तक्रारी दिल्या; मात्र चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे डांबरीकरणाचे काम बंद पाडले आहे.

-मीना अविनाश ठाकरे, सरपंच निहिदा