शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, उपमहापौरांच्या प्रभागात डुकरांचा उच्छाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 14:35 IST

वराह पालनाच्या व्यवसायातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करणारे वराह पालक महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे.

अकोला: शहरात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, त्यामध्ये महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांच्या प्रभागांचाही समावेश आहे. वराह पालनाच्या व्यवसायातून वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करणारे वराह पालक महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी केली असता, त्यावर उद्या बुधवारी आयुक्तांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत ठोस तोडगा निघतो की आयुक्त नेहमीप्रमाणे आश्वासनांचे ‘चॉकलेट’ देतात, याकडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत उघड्यावर शौच करणाऱ्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांना वैयक्तिक शौचालय बांधून देण्याची मोहीम मनपाने पार पाडली. मनपाने शहर हगणदरीमुक्तीसाठी ठोस प्रयत्न केले असले तरी, आता डुकरांच्या समस्येने त्यात भर घातली आहे. डुकरांच्या विष्ठेतून परिसरात दुर्गंधी व घातक जीवाणू पसरत असल्यामुळे त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी अकोलेकरांकडून होत आहे. सर्वपक्षीय नगरसेवकच नव्हे, तर खुद्द महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांच्या प्रभागात मोकाट डुकरांनी उच्छाद मांडला असून, सर्वसामान्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात खुद्द सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक अजय शर्मा यांनी आयुक्त संजय कापडणीस यांना पत्राद्वारे वारंवार शहरातील मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.तोडगा निघेल का?भाजपचे नगरसेवक अजय शर्मा यांनी आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सतत पत्रव्यवहार करून मोकाट डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी यापूर्वी अनेकदा केली आहे. त्यावर पोलीस प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे थातूरमातूर आश्वासन आयुक्त कापडणीस यांनी दिले होते. या मुद्यावर अकोलेकर त्रस्त झाले असताना आयुक्तांकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याने उद्याच्या बैठकीत तोडगा निघेल का, याकडे लक्ष लागले आहे.‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई का नाही?वराह पालनातून वर्षाकाठी लाखो रुपयांची रग्गड कमाई करणारे बहुतांश व्यावसायिक महापालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागात सफाई कर्मचारी म्हणून सेवारत आहेत. शहरातील हॉटेल व्यावसायिकांना परिसरात अस्वच्छता पसरविल्याप्रकरणी मनपाकडून दंड आकारणी केली जाते; परंतु रहिवासी वस्त्यांमध्ये डुकरांच्या माध्यमातून किळसवाणी घाण व अस्वच्छता पसरविणाºया संबंधित मनपा कर्मचाºयांवर आयुक्त कापडणीस कारवाईचा बडगा उगारतील का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका