अकोला : ह्यह्यया जगाची त्या जगाला ओढ राहिली नाही, जिभेच्या द्वेषापोटी साखर गोड राहिली नाही..ह्णह्ण अशा सर्मपक ओळीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य फ.मु. शिंदे यांनी सध्याची परिस्थितीत मांडली. आज माणूस हरविला आहे. अशा परिस्थितीत माणसाचा शोध घेताना पाठकोरा कागद व पाठमोरा माणूस वाचता आला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी शनिवारी रात्री अकोल्यात व्यक्त केली. नागरी सत्कार व ज्येष्ठ पत्रकार फ.मु. शिंदे यांच्या ह्यचौफेर कलमह्ण या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लोककवी प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. राजभाऊ देशमुख उपस्थित होते. पुढे बोलताना, ते म्हणाले प्रतिभेची पूजा एकलव्यासारखी लेखक करीत असतो. तो आपल्या लेखनातून व्यक्त होत असतो. मधु जाधव यांनी आपल्या लेखनातून व्यक्त होऊन समाजाला दिशादर्शक विचार दिले असल्याचे सांगितले. जाधव हे प्रलोभनाचे नाही तर प्रबोधनाचे पत्रकार आहेत, असा गौरवोद्गार शिंदे यांनी जाधव यांच्याबद्दल काढले. त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट त्यांच्या सुप्रसिद्ध ह्यआईह्ण या कवितेने केला. प्राचार्य डॉ. विठ्ठल वाघ यांनी जाधव यांच्या लेखनात कुठला ह्यअभिनयह्ण नाही तर भक्कम अशी ह्यभूमिकाह्ण असल्याचे सांगितले. लेखकात वेड आणि झपाटलेपण आवश्यक आहे आणि ते जाधव यांच्यात असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या परिस्थितीवर ताशेरे ओढ ताना त्यांनी ह्यह्यगावातले बैल गेले लय आके झाले, शिकोरीत नाही लोणी मस्तवाल बोके झालेह्णह्ण असा भाव व्यक्त केला. प्रा. राजाभाऊ देशमुख यांनी मधु जाधव यांचे पुस्तक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, पत्रकार अशा सर्वांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले. त्यांनी जाधव यांच्या लेखनाचे कौ तुक केले. आपल्या मनोगतातून मधु जाधव यांनी आपण वाचनाच्या प्रक्रियेतूनच लेखनाकडे वाटचाल केल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. गजानन नारे यांनी केले. मानपत्र वाचन प्रा. डॉ. ममता इंगोले यांनी केले. यावेळी व्यगंचित्रकार गजानन घोगंडे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अशोक ढेरे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठय़ा संख्येने उ पस्थित होते.
पाठकोरा कागद व पाठमोरा माणूस वाचता आला पाहिजे
By admin | Updated: September 7, 2014 01:39 IST