शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

ठाणेदार प्रेमानंद कात्रेंची उचलबांगडी

By admin | Updated: June 30, 2017 01:26 IST

सिरसोली येथील गजानन इंगळे आत्महत्या प्रकरण भोवले; रात्री ३ वाजता झाले इंगळेंवर अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महिलेच्या विनयभंगप्रकरणी पोलीस चौकशीचा ससेमिरा लागल्याने या कथित प्रकरणात आपल्याला गोवल्या जाऊ नये, या भीतीने सिरसोली येथील गजानन इंगळे या शेतमजुराने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर सिरसोलीत निर्माण झालेला तणाव, गावकरी व नातेवाइकांचा रोष पाहता हिवरखेड येथील ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांची तातडीने उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांना मुख्यालयात बोलावून घेण्यात आले आहे, तर या ठिकाणी अकोट शहर पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांना हिवरखेड पोलीस स्टेशनचा पदभार देण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी पसार झाले आहेत.सिरसोली येथील विवाहित महिलेच्या विनयभंगप्रकरणी पोलीस चौकशीला बोलाविलेल्या गजानन इंगळे याने विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान २८ जून रोजी त्याचा मृत्यू झाला. गावकरी व नातेवाइकांनी ठाणेदार व गजानन इंगळे यांच्यावर दबाव आणणाऱ्या आरोपींवर कारवाईची मागणी करीत मृतदेह न उचलण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पोलिसांनी उशिरा रात्री मृतक इंगळेला धमकी देणाऱ्या आरोपी मोबीन अली सफदर अली, इमदाद अली, इम्रानअली इमदाद अली यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले, तर ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले. उशिरा रात्री ३ वाजता मृतक गजानन इंगळे याच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिरसोली येथे दुपारी ३ वाजल्यापासून रात्री ३ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे यांच्यासह इतर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी तळ ठोकून होते, तर हिवरखेड पोलीस स्टेशनला अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. दरम्यान, सिरसोली येथे ग्रामपंचायतमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली. गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शांतता ठेवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीला ठाणेदार निशांत मेश्राम, तेल्हारा नायब तहसीलदार, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी उपस्थित होते. दरम्यान, २९ जून रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ हिवरखेडचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांची मुख्यालयात बदली केली, तर त्या ठिकाणी अकोट येथील सहायक पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम यांना हिवरखेड येथे रुजू होण्याचे आदेश दिले.