शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फिजिओथेरेपी ही औषध मुक्त उपचार पद्धती ! - डॉ. अतुल काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 19:07 IST

अस्थिरोग तज्ज्ञांसह इतर डॉक्टरांच्या समन्वयातून जनसामान्यात फिजिओथेरेपी रुजणार, असे मत फिजिओथेरेपिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बातचीत करताना व्यक्त केले.

- प्रवीण खेतेअकोला: फिजिओथेरेपी ही आधुनिक उपचार पद्धती असून याविषयी जनसामान्यात जनजागृतीची गरज आहे. ही उपचार पद्धती विना औषध, विना इंजेक्शन असून केवळ व्यायामाच्या सहाय्याने मासपेशी मजबुत करुन रुग्णाला बरे करते. त्यामुळे रुग्णाला योग्य उपचार मिळावा या अनुषंगाने अस्थिरोग तज्ज्ञांसह इतर डॉक्टरांच्या समन्वयातून जनसामान्यात फिजिओथेरेपी रुजणार, असे मत फिजिओथेरेपिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बातचीत करताना व्यक्त केले.

‘फिजिओथेरेपी’ची उपचार पद्धती कशी आहे़?फिजिओथेरेपी ही विना औषध, विना इंजेक्शन अशी उपचार पद्धती आहे. या अंतर्गत केवळ व्यायाम आणि विविध मशीनच्या सहाय्याने रुग्णांच्या मांसपेशी मजबुत करुन त्यांना बरे केले जाते. विशेषत: असाध्य आजार असलेल्या रुग्णांसाठी ही उपचारपद्धती अधिक प्रभावी असून, लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.

फिजिओथेरेपी किती प्रभावी आहे ?कुठलीच पॅथी पूर्ण नसते. मात्र, फिजिओथेरेपी ही इतर पॅथीच्या सहाय्याने उपचार करते. केवळ फिजिओथेरेपीच्या मदतीने रुग्ण ८० ते ८५ टक्के बरा होऊ शकतो. शिवाय, रुग्णाच्या मांसपेशी मजबुत करण्यास मदत करत असल्याने इतर आजारांपासूनही बचाव करते. त्यामुळे इतर पॅथीसोबतच फिजिओथेरेपी रुग्णांना बरे करण्यासाठी प्रभावी आहे.

कोणत्या रुग्णांसाठी फिजिओथेरेपी प्रभावी ठरते ?कुठल्याही आजाराची सुरूवात ही मासपेशींपासून होते. त्यामुळे व्यायाम हा एकमात्र उपाय आहे. हेच कार्य फिजीओथेरेपी करत असून, कंबर दुखी, सांधे दुखी, मायग्रेन, डोकेदुखी,गुडघे दुखी, हातापायांना मुंग्या येणे, अपघातानंतर फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांसाठी ही उपचार पद्धती प्रभावी ठरते.

फिजिओथेरेपी जनसामान्यत रुजवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे?फिजिओथेरेपी ही आधुनिक उपचार पद्धती असून, १९९६ पासून प्रचलनात आली. या तुलनेत अस्थिरोग, मेडिसीन या शाखा कितीतरी जुन्या आहेत. म्हणूनच अस्थिरोग तज्ज्ञ किंवा एमडी मेडिसीन यांच्या समन्वयातूनच फिजिओथेरेपी ही जनसामान्यात प्रभावीपणे पोहोचू शकते. या दोन्ही शाखांचा समन्वय झाल्यास रुग्णांचा रुग्णाला योग्य उपचार मिळण्यास मदत होईलच शिवाय, डॉक्टरांवरील त्यांचा विश्वास अधिक दृढ होईल.

इतर डॉक्टरही व्यायामाच्या टिप्स देऊ शकतात का?प्रत्येक शाखा वेगळी असून त्याचा अभ्यास वेगळा आहे. त्यामुळे फिजिओथेरेपीच्या टिप्स केवळ फिजिओथेरेपिस्टच योग्य पद्धतीने देऊ शकतो. अनेकदा काही डॉक्टर रुग्णांना चुकीच्या व्यायामाच्या टिप्स देत असल्याने रुग्णांचा त्रास वाढल्याच्या घटना घडल्या आहेत.

 

टॅग्स :interviewमुलाखतAkolaअकोलाdoctorडॉक्टर