शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण करणारा गजाआड

By admin | Updated: May 24, 2017 01:36 IST

अकोला: अकोट फैल परिसरात कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमजाळ्यात ओढून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या एका विवाहित इसमास अकोट फैल पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोट फैल परिसरात कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमजाळ्यात ओढून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या एका विवाहित इसमास अकोट फैल पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास गुरुवारपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.अकोट फैलमधील रहिवासी असलेली १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी नायगाव आणि अकोट फैल येथे कचरा वेचण्याचे काम करण्यासाठी दररोज जात होती. या ठिकाणी कचरा वेचताना तिची ओळख याच परिसरातील रहिवासी शेख नासीर शेख कालू (२०) याच्याशी झाली. या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. त्यानंतर गत एक वर्षापासून ते दोघे एकमेकांना न चुकता भेटत होते. दरम्यान, तीन दिवसाआधी शेख नासीरची पत्नी मुलासह माहेरी गेली असता घरी कुणीही नसल्याची संधी साधत शेख नासीरने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन तिचे शारीरिक शोषण केले. हा प्रकार सतत सुरू असतानाच त्याची पत्नी अचानक घरी परतली असता तिला तिच्या पतीचे अल्पवयीन मुलीसोबत असलेले शारीरिक संबंध दिसले. हा प्रकार दोघांच्या कुटुंबीयांना माहिती झाल्यानंतर अल्पवयीन मुलीला व शेख नासीर या दोघांनाही मारहाण करण्यात आली. घडलेला प्रकार अल्पवयीन मुलीने आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी अकोट फैल पोलीस स्टेशनला मारहाण प्रकरणाची तक्रार दिली असता पोलिसांनी मुलीला मारहाण करण्याचे कारण विचारले; मात्र कारण देण्यास आई-वडील असमर्थ ठरल्याने पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. त्यामुळे घडलेला लैंगिक शोषणाचा प्रकार अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितला. यावरून पोलिसांनी शेख नासीर याच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.