शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा शेती उद्योगाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:17 IST

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलची दरवाढ वरचेवर होत आहे. दोन महिन्यांमध्ये २० वेळा पेट्रोल दरवाढ झाली आहे. पेट्रोल ...

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलची दरवाढ वरचेवर होत आहे. दोन महिन्यांमध्ये २० वेळा पेट्रोल दरवाढ झाली आहे. पेट्रोल दरवाढ होत असल्याने पेट्रोल लीटरमागे शंभरी गाठणार असे वाटत असल्याने सर्वसामान्य वाहनधारकांचे बजेट कोलमडले आहेत. गेल्या वर्षी पेट्रोलचा दर ८० रुपयांच्या आसपास होता. मात्र २०२० च्या डिसेंबरपासून पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतकरी पारंपरिक शेतीकडून आधुनिक शेतीकडे वळला आहे. बैलजोडीने होणारी मशागत व इतर कामे ट्रॅक्‍टरद्वारे व इतर कृषी यंत्राद्वारे केली जात आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल दरवाढीचा फटका आता शेती उद्योगालाही बसणार असल्याने शेती उद्योग अगोदरच संकटात असताना त्या संकटात मात्र अजून भर पडणार आहे. आता काही दिवसात शेतीच्या मशागतीचे कामे सुरू होणार असून डिझेल दरवाढीमुळे शेतकरी वर्ग चिंतित झाला आहे. अगोदरच नैसर्गिक संकटाने शेतकरी वारंवार संकटात सापडत आहे. यातच डिझेलच्या दरवाढीने शेतीवरही संक्रांत आली आहे. असे मत शेतकरी महेश वारकरी यांनी मांडले. शिक्षक अनंत साकरकर यांनी, दुचाकीशिवाय नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी जाणे-येणे होत नाही. आता पेट्रोलच्या दरात वरचेवर वाढ होत असल्याने आर्थिक बजेटही कोलमडत असल्याचे मत व्यक्त केले.