शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक, खतांचे पाच नमुने निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 12:43 IST

पुढील कारवाई करण्यासाठी संबंधित तेल्हारा, पातूर पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडून नोटीस दिल्या जाणार आहे.

अकोला : कीटकनाशक, खतांच्या तपासणीमध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पंचायत समिती स्तरावर घेतलेले आणखी पाच नमुने निकृष्ट असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यावर पुढील कारवाई करण्यासाठी संबंधित तेल्हारा, पातूर पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडून नोटीस दिल्या जाणार आहे.हंगामात बियाणे कंपन्यांकडून बोगस खते, कीटकनाशक, बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते. हा प्रकार रोखण्यासाठी पेरणीपूर्वी किंवा त्यानंतर सर्वच कृषी निविष्ठांचे नमुने तपासणी केली जाते. त्या नमुन्यांच्या तपासणीमध्ये ते अप्रमाणित (बोगस) आढळून येतात. बियाणे, खत, कीटकनाशकांचे नमुने तपासणीत बोगस आढळून आल्यास ठरलेल्या मुदतीत प्रकरण न्यायालयात दाखल करावे लागते. प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही बियाणे निरीक्षकांनी कंपन्यांशी हातमिळवणी करून पुढील कारवाईस फाटा दिल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. मे महिन्यात बीटी कापूस बियाण्यांचे नमुने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतले. त्यामध्ये सात नमुने निकृष्ट असल्याचा अहवाल नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेने दिला आहे. पाच कंपन्यांच्या बियाण्यांमध्ये बीटी जिन्सचे प्रमाण, रेफ्युजीचे प्रमाण कमी असल्याने नमुने रद्द ठरले आहेत. त्या बियाणे उत्पादक कंपन्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नोटीस बजावली. त्यामध्ये पाच बियाणे उत्पादक कंपन्यांच्या बियाण्यांचे सात नमुने अपयशी ठरले आहेत. बियाणे नमुन्यात बीटी जिन्सचे प्रमाण कमी आढळल्याने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यांनी स्पष्टीकरण सादर केले; मात्र ते समाधानकारक नसल्याने कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात प्रकरणे दाखल केली जाणार आहेत. कोणत्याही कंपनीच्या बियाण्यांचे, खत, कीटकनाशकांचे नमुने अप्रमाणित असल्याचा अहवाल प्राप्त होताच न्यायालयात प्रकरण दाखल करणे बंधनकारक आहे.

नमुने निकृष्ट आढळलेले उत्पादककापसाचे बियाणे बोगस आढळलेल्या उत्पादकांमध्ये बायर बायोसायन्स कंपनीचे २ नमुने, सनग्रो सीड्स लि.चा-१, साउदर्न अ‍ॅग्रो सायन्स-२, नर्मदा सागर-१, श्रीराम बायोसिडस-१ नमुन्याचा समावेश आहे.

पातूर, तेल्हाºयातील नमुने निकृष्टकृषी विभागाने पंचायत समिती स्तरावर घेतलेले पाच नमुने निकृष्ट असल्याचा अहवाल प्रयोगशाळेतून प्राप्त झाला आहे. त्यामध्ये तेल्हारा येथील तीन तर पातूर येथील दोन नमुने आहेत. त्यापैकी तीन कीटकनाशक तर दोन खतांचे नमुने असल्याची माहिती आहे. त्या उत्पादकांनाही कारणे दाखवा नोटीस दिली जाणार आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती