शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

परवानगी ३२८.६८ चाैरस मीटरची ; बांधकाम केले १०२४ चाैरस मीटर; चार मजली इमारतीवर मनपाचा हाताेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 10:45 IST

Akola News : सिंधी कॅम्पस्थित हिराबाइ प्लाॅटमध्ये धन्नुमल आलिमचंदानी यांच्या चार मजली इमारतीवर कारवाईला प्रारंभ करण्यात आला.

अकाेला: महापालिकेने इमारतीचे बांधकाम करण्यासाठी ३२८.६८ चाैरस मीटरची परवानगी दिल्यानंतर मालमत्ता धारकाने प्रत्यक्षात १ हजार २४ चाैरस मीटरचे बांधकाम केल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी कारवाईचा बडगा उगारला. शनिवारी दक्षिण झाेनमधील सिंधी कॅम्पस्थित हिराबाइ प्लाॅटमध्ये धन्नुमल आलिमचंदानी यांच्या चार मजली इमारतीवर कारवाईला प्रारंभ करण्यात आला.

महापालिकेच्या नाकावर टिच्चून शहरात अनधिकृत इमारती उभारणे, ‘टीडीआर’देताना मनपा प्रशासनासह शासनाची दिशाभूल करणे, जाणीवपूर्वक हार्डशिप ॲन्ड कम्पाउंडिंगचे प्रस्ताव सादर न करणे आदी प्रकार सर्रासपणे सुरु आहेत. नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांना हाताशी धरुन ही कामे निकाली काढली जात आहेत. तसेच नियमांवर बाेट ठेवणे पसंत करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल वरिष्ठांची दिशाभूल करुन त्यांची इतर विभागात बदली करण्याचे काम स्थानिक राजकीय नेते करीत असल्याने एकूणच या विभागाचे कामकाज रसातळाला गेल्याचे दिसत आहे. या सर्व बाबींचा फायदा अनधिकृत बांधकाम करुन उजळमाथ्याने वावरणारे मालमत्ता धारक घेत आहेत. सिंधी कॅम्पमधील हिराबाइ प्लाॅटमध्ये धन्नुमल आलिमचंदानी यांना मनपाने रहिवासी इमारत बांधण्यासाठी ३२८.६८ चाैरस मीटरची परवानगी दिली हाेती. आलिमचंदानी यांनी सर्व निकष,नियम धाब्यावर बसवित चक्क १ हजार २४ चाैरस मीटरचे बांधकाम केले. मनपाच्या नगररचना विभागाने प्रत्यक्षात स्थळ निरीक्षण केले असता मालमत्ता धारकाने तब्बल ६९५.३२ चाैरस मीटरचे अनधिकृत बांधकाम केल्याचे समाेर आले.

 

एकाच इमारतीवर तिसऱ्यांदा कारवाई

या इमारतीवर महापालिकेने यापूर्वी दाेन वेळा निष्कासनाची कारवाई केली हाेती. त्या प्रत्येकवेळी इमारतीचा अतिक्रमित भाग स्वत: ताेडणार असल्याचे सांगत मालमत्ता धारकाकडून अवधी मागितला जात हाेता. शनिवारी या इमारतीवर तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली,हे विशेष.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला