शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांनी काढला सरपंचाच्या घरावर मोर्चा

By admin | Updated: June 24, 2017 05:54 IST

धामणा गावात सहा महिन्यांपासून पाणीटंचाई.

बोरगाव वैराळे: अकोला तहसील अंतर्गत येत असलेल्या धामणा गावात मागील सहा महिन्यांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ गावालगतच्या पूर्णा नदीवरून पिण्यासाठी पाणी आणत होते; मात्र आता पावसाळा सुरू झाल्यामुळे पूर्णा नदीत जाणारा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. त्यामुळे आता पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. याला कंटाळून अखेर ग्रामस्थांनी सरपंच चंद्रकला सावंग यांच्या घरावर मोर्चा काढून पिण्यासाठी नळ योजनेचे पाणी तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली.धामणा व नवीन धामणा गावाला खांबोरा ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरून पाणीपुरवठा केल्या जातो. गेल्या सहा महिन्यांपासून या गावात पाणीपुरवठा करणार्‍या पाइपलाइनवर लिकेज असल्यामुळे पिण्याचे पाणी पोहचले नाही. या पाणीटंचाईच्या काळात ग्रामस्थ पिण्यासाठी पूर्णा नदीच्या पात्रातून पाणी आणत होते; मात्र पहिल्याच पावसात पूर्णा नदीपात्रात उंच कड्यावरून उतरणारा रस्ता वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी जीव धोक्यात घालून पूर्णा नदीचे पाणी आणावे लागत आहे. पूर्णा नदीचे पाणी आणताना भविष्यात दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीची दखल घेऊन धामणा येथील ग्रामस्थांनी सरपंच चंद्रकला सावंग यांच्या घरावर मोर्चा काढून तत्काळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी गावात पोहचविण्यासाठी साकडे घातले.