शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींच्या कामापोटी शेतक-यांची देयके प्रलंबित

By admin | Updated: July 7, 2015 01:42 IST

जिल्ह्यातील शेतक-यांना देयके अदा करण्यासाठी ३ कोटी वितरित.

संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींच्या बांधकामांसाठी (कुशल) शेतकर्‍यांची देयके अदा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सातही पंचायत समिती स्तरावर ३ कोटी ३७ लाख १६ हजारांचा निधी वितरित करण्यात आला असून, त्यापैकी १ कोटी ७0 लाखांच्या कामांची देयके सोमवारपर्यंत अदा करण्यात आली असून, उर्वरित १ कोटी ६७ लाख १६ हजार रुपयांची शेतकर्‍यांची देयके अद्यापही प्रलंबित आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी मूर्तिजापूर, पातूर व तेल्हारा या सातही तालुक्यातील १ हजार ७६९ सिंचन विहिरींची बांधकामे (कुशल कामे) पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार रोहयो विभागामार्फत २५ जून रोजी ३ कोटी ३७ लाख, १६ हजार रुपयांचा निधी सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकार्‍यांना वितरित करण्यात आला. हा निधी ग्रामपंचायतींना वितरित करून, सिंचन विहिरींच्या बांधकामांपोटी संबंधित शेतकर्‍यांची प्रलंबित देयके अदा करण्यात यावे आणि निधी वितरणाचा अहवाल ३0 जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकार्‍यांमार्फत पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आले होते. निधी वितरित करण्यात आल्यानंतर दहा दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र सिंचन विहिरींच्या कामांसाठी देयके अदा करण्याकरिता उपलब्ध निधीतून सोमवापर्यंत १ कोटी ७0 लाखांची देयके अदा करण्यात आली असून, उर्वरित १ कोटी ६७ लाख १६ हजार रुपयांची शेतकर्‍यांची देयके अदा होणे अद्याप बाकी आहे. प्रलंबित देयकांची रक्कम केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा संबंधित शेतकर्‍यांकडून केली जात आहे.