शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

रोहयाची मजूरी विलंबाने दिल्यामुळे बीडीओ, तहसीलदारांना दंड

By admin | Updated: October 14, 2016 02:32 IST

अकोला जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील चित्र; पंधरा दिवसात मजूरी देण्याचे निर्देश बेदखल.

अकोला, दि. १३- राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची मजुरी वेळेत न दिल्याने जिल्हय़ातील सातही तहसीलदार, गटविकास अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून ४ लाख ३२ हजार रुपये दंड वसुलीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी १ लाख २४ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित दंडाची रक्कम वसुलीची कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कामावर असलेल्या मजुरांना पंधरा दिवसांत मजुरीची रक्कम द्यावी लागते. तसे न झाल्यास मजुरी अदा करण्यासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणेतील ग्रामरोजगारसेवक ते तहसीलदार, गटविकास अधिकार्‍यांना प्रतिदिवस दंड करण्याचे आदेश आहेत. जिल्हय़ात हा प्रकार प्रत्येक महिन्यात घडत आहे. त्यामुळे मजुरी देण्यास विलंब करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांवर विलंबाचा दंड वसुलीची रक्कम वाढतच आहे. दरमहा संबंधित गटविकास अधिकारी, तहसीलदार स्तरावरून वाटप होणार्‍या मजुरीचे ऑनलाइन मस्टर तयार होते. त्यामध्येच विलंब झालेल्या मजुरीची रक्कमही दिसते. त्यानुसार मजुरीला विलंबासाठी कोण जबाबदार आहे, हे तहसीलदार व गटविकास अधिकारी ठरवितात. त्यामध्ये त्यांचाही समावेश असतो. पंधरा दिवसांतच मजुरी वाटप बंधनकारकठरलेल्या प्रक्रियेनुसार ग्रामरोजगार सेवकाने दोन दिवसांत मस्टर तयार करावे, चार दिवसांत कामाची मोजमाप पुस्तिका तयार व्हावी, पंचायत समिती, तहसील कार्यालयाने दोन दिवसांत कामाची पडताळणी करावी, डीएससीने मजुरी खात्यात वळती करावी, असे आहे. या पंधरा दिवसांच्या काळात ग्रामरोजगारसेवक, ग्रामसेवक, तांत्रिक अधिकारी, अव्वल कारकून, लेखाधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्या साखळीत कोठे उशीर झाला, यावरच मजुरीला झालेल्या विलंबासाठी संबंधिताला जबाबदार धरले जाते. तहसीलदार, बीडीओकडून वसूलपात्र रक्कमतालुका रक्कमअकोला            ८0४६८आकोट              ३१४२ बाळापूर            २४८३५बाश्रीटाकळी      ५५७८४मूर्तिजापूर         ३८८१0पातूर               २१८९३८तेल्हारा              १६0८९-----------------------------------------------एकूण               ४३८0९६