शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याने बनविले हळद पॉलिश यंत्र !

By admin | Updated: December 14, 2014 23:54 IST

अनुभव हाच गुरु, बाजारभावाची गरज ओळखली !

हर्षनंदन वाघ/ बुलडाणा तालुक्यातील मासरूळ येथील शेतकरी जगन्नाथ बाबूराव उंबरकर यांनी हळदीचे पीक घेताना आलेल्या विविध अनुभवातून हळद पॉलिश करण्याचे यंत्र विकसित केले आहे. या यंत्राचा त्यांच्यासह परिसरातील हळदीचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना फायदा होत आहे.बुलडाणा तालुक्यातील मासरूळ परिसरात अनेक वर्षापासून मसाला पिकाचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यात हळदीचा प्रामुख्याने सामावेश आहे. येथील बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले जगन्नाथ बाबूराव उंबरकर हे सुध्दा हळदीचे पीक घेतात. पीक काढत असताना त्यांना असंख्य अनुभव आले. त्यातूनच त्यांनी हळदीला पॉलिश करण्याचे यंत्र विकसीत केले आहे. पॉलिश केल्याशिवाय हळद आकर्षक दिसत नाही. यामुळेच हळदीला बाजारभावसुध्दा चांगला मिळत नाही. बाजारभावाची गरज ओळखून जगन्नाथ उंबरकर यांनी पुढाकार घेतला. यासाठी त्यांनी लोखंडी १६ एम.एम.जाडीचा पत्रा गोल करून त्यापासून बॅरल तयार केले. या बॅरलची साईज सहा फुट आहे. त्यातील रॉडची लांबी सात फुट आहे. हे बॅरल ठेवण्यासाठी एक स्टँड तयार केले. हळद भरण्यासाठी बॅरलला १.५ बाय १.५ फुट आकाराचे तोंड ठेवले. बॅरलमधून एक लोखंडी दांडा बसवून त्याच्या पिंपाच्या बाहेर दोन्ही बाजूला व्हील बसवून ते इलेक्ट्रीक मोटारीच्या साहाय्याने गोलाकार फिरवता येते. बॅरलच्या लोखंडी रॉडवर घर्षणासाठी अणकुचीदार त्रिकोणी आकाराचे पाते बसविले आहे. या बॅरलवर ९ ते १0 इंच आकाराचे छिद्र पाडल्याने पॉलिश करताना हळदीचे अवशेष त्यातून बाहेर पडतात. अशा प्रकारच्या बॅरलमध्ये पॉलिश करण्यासाठी २ ते १३ दिवस वाळलेली हळद टाकून त्यामध्ये घर्षणासाठी वापरता येते. १५ मिनीटात एक क्विंटल हळद पॉलिश होते. दिवसाला सरासरी २0 ते २५ क्विंटल क्षमतेपर्यंत हळद पॉलिश करता येऊ शकते. या यंत्राचा उपयोग जगन्नाथ उंबरकर स्वत:सह परिसरातील शेतकर्‍यांसाठी करीत आहेत.