शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पेढीवाल आत्महत्या प्रकरणाला वेगळी कलाटणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:39 IST

अकोला : बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित  असलेल्या कारंजा येथील के. एन. महाविद्यालयाचे प्राचार्य  गजानन पेढीवाल यांनी पुण्यात आत्महत्या केली होती. ते  प्रचंड मानसिक ताणात असल्याने त्यांनी प्राचार्य पदाचा  राजीनामा दिला होता; मात्र सदर राजीनामा संचालक  मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला नाही, तसेच तो  मंजूरही करण्यात आला नसल्याने तणावात आलेल्या  पेढीवाल यांनी आत्महत्या केल्याची माहिती आता समोर  आली आहे.

ठळक मुद्देराजीनामा मंजूर न केल्याने होते तणावातएका संचालकानेच दिले दोनदा पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित  असलेल्या कारंजा येथील के. एन. महाविद्यालयाचे प्राचार्य  गजानन पेढीवाल यांनी पुण्यात आत्महत्या केली होती. ते  प्रचंड मानसिक ताणात असल्याने त्यांनी प्राचार्य पदाचा  राजीनामा दिला होता; मात्र सदर राजीनामा संचालक  मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला नाही, तसेच तो  मंजूरही करण्यात आला नसल्याने तणावात आलेल्या  पेढीवाल यांनी आत्महत्या केल्याची माहिती आता समोर  आली आहे. वाशिम जिल्हय़ातील कारंजा येथील के. एन.  महाविद्यालयात गजानन लक्ष्मीनारायण पेढीवाल (५४) हे  प्राचार्य म्हणून कार्यरत होते; मात्र प्रकृती अस्वस्थतेमुळे  त्यांनी १ जुलै २0१७ रोजीच प्राचार्य पदाचा राजीनामा दिला  होता. सदर राजीनाम्यावर दिनांक टाकण्यात आली नव्हती,  अशी माहिती सूत्रांनी दिली. सदर राजीनामा संस्थेच्या  संचालक मंडळाची ७ जुलै राजी असलेल्या बैठकीमध्ये  ठेवून तो मंजूर करावा की नाही, यावर चर्चा होणार होती;  मात्र राजीनामा हा बैठकीसमोर ठेवण्यातच आला  नसल्याची माहिती आहे. त्यामुळे एका संचालकाने १0 जुलै रोजी संस्थेला पत्र देऊन  प्राचार्य पेढीवाल यांनी राजीनामा दिला होता का, दिला  असल्यास तो संचालक मंडळाच्या बैठकीत का ठेवण्यात  आला नाही, याचे उत्तर मागितले; मात्र संस्थेद्वारे सदर  संचालकास उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे या  संचालकाने पुन्हा एकदा २६ जुलै रोजी पत्र देऊन उत्तर  मागितले; मात्र त्याच रात्री पेढीवाल यांनी गळफास घेऊन  आत्महत्या केली. या प्रकरणात आता पुण्यातील कोंढवा  पोलीस तपास करीत असून, ते दोन वरिष्ठ संचालक कोण  आहेत, याचा शोध घेण्यात येत आहे.

ते दोन वरिष्ठ संचालक कोण?प्राचार्य पेढीवाल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन वरिष्ठ  संचालकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत  असल्याचे लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद आहे. या प्रकरणामध्ये  शरद चवरे आणि डॉ. भावे यांची नावे समोर आली होती;  मात्र हे दोघेही वरिष्ठ संचालक नाहीत. चवरे हे कनिष्ठ  संचालक आहेत, तर भावे प्राध्यापक आहेत, त्यामुळे  चिठ्ठीत उल्लेख केल्याप्रमाणे ते दोन वरिष्ठ संचालक कोण  आहेत, याचा तपास पुणे पोलीस आता नव्याने करीत  असल्याची माहिती सूत्रांनी दिली.