शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पातूरची मनोरुग्ण महिला नागपुरात सापडली!

By admin | Updated: February 17, 2017 02:49 IST

नागपूर पोलिसांनी महिलेस पातुरात आणून कुटुंबीयांच्या केले स्वाधीन.

पातूर, दि. १६- बाळापूर वेसीजवळील पुलाजवळ राहणारी मनोरुग्ण विवाहिता पाच ते सहा वर्षांपूर्वी बेपत्ता झाली होती. ही महिला नागपुरात सापडली असून तिला १६ फेब्रुवारीला पोलिसांनी पातुरात आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. बाळापूर वेसीजवळ राहणारी ३५ वर्षीय पायल प्रभाकर विजयकर ही महिला गेल्या सहा ते सात वर्षांपूर्वी घरातून निघून गेली होती. तिचा नातेवाइकांनी शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. १६ डिसेंबर २0१६ रोजी ती बेवारस भटकत असताना नागपूर पोलिसांना आढळली. पोलिसांनी तिला नागपूर येथील शासकीय प्रियदर्शनी महिला वसतिगृहात दाखल केले. त्यानंतर जवळपास दोन महिने तिच्यावर उपचार करून तिच्याकडून कुटुंबीयांची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. वसतिगृहातील केअर टेकर महिला रेणू रामेश्‍वर मसराम यांना ती पातूरची असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांच्या मदतीने पायल विजयकर यांना गुरुवारी पातुरात आणले. पातूर पोलिसांच्या मदतीने तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या महिलेला एक १८ वर्षांचा मुलगा व दोन मुली आहेत. या प्रकरणी पोकॉ भूषण व मनीष घुगे यांनी सहकार्य केले.