शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पातूर, बाळापुरातील १०८ रुग्णवाहिकेची सेवा इतर जिल्ह्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:34 IST

वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांची सेवा ठप्प पडली आहे.

अकोला : कमी वेतनामुळे १०८ रुग्णवाहिकेच्या अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा बंद केली आहे. तर दुसरीकडे नादुरुस्त रुग्णवाहिकांमुळे वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांची सेवा ठप्प पडली आहे. परिणामी पातूर, पिंजर आणि बाळापूर येथील १०८ रुग्णवाहिकांना शेजारील जिल्ह्यांमध्ये सेवा द्यावी लागत आहे. त्याचा थेट परिणाम जिल्ह्यातील रुग्णसेवेवर होत आहे.जिल्ह्यात अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट आणि बेसिक लाइफ सपोर्ट अशा दोन प्रकारच्या रुग्णवाहिका सेवा देत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मदतीने २०१३ मध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी ही सेवा सुरू केली होती. अपघात झाल्यास किंवा दवाखान्यातून जाऊन तत्काळ उपचार घेण्याची गरज भासल्यास १०८ क्रमांकावर कॉल करताच किमान वेळेत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल होते; मात्र वाशिम आणि बुलडाण्यासह शेजारील जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के रुग्णवाहिकांची सेवा ठप्प असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील आपत्कालीन रुग्णांसाठी अकोला जिल्ह्यातील पातूर, पिंजर आणि बाळापूर येथील १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिकांची मदत घेतली जाते; परंतु ही मदत घेताना त्याचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील रुग्णसेवेवर होत आहे. अनेकदा या दोन तालुक्यातील रुग्णांसाठी १०८ रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते.जिल्ह्यात १२ रुग्णवाहिकाजिल्ह्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या १२ रुग्णसेवेत कार्यरत आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेत ही स्थिती काही प्रमाणात चांगली आहे; मात्र शेजारील जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के रुग्णवाहिकांची सेवा ठप्प आहे. १०८ रुग्णवाहिकांना जिओ टॅपिंग केले असल्याने जिल्ह्यातील काही रुग्णवाहिकांना शेजारील जिल्ह्यात पाठविण्यात येते.१०८ रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी आरोग्य विभागामार्फत संबंधित कंपनीला लाखो रुपयांचा निधी दिला जातो; परंतु काही रुग्णवाहिकांची सेवा बंद असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. जिल्ह्यातील रुग्णवाहिका सेवेसाठी इतर जिल्ह्यात पाठविण्यात येतात. त्याचा थेट प्रभाव जिल्ह्यातील रुग्णसेवेवर दिसून येतो.- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला

 

टॅग्स :Akolaअकोला