शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पातूरच्या अक्षयची बॉक्सिंगमध्ये गगन भरारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:44 IST

शिर्ला  : जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीवर मात करून, येथील अक्षय टेंभुर्णीकर या युवा बाक्सिंग प्रशिक्षकाने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संघाला पदकं मिळवून देऊन गगनाला गवसणी घातली आहे.

ठळक मुद्दे प्रशिक्षक म्हणून मिळवले नाव  आंतर विद्यापीठ, राष्ट्रीय स्तरावर विविध पदके

संतोषकुमार गवई । लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला  : जिद्द, चिकाटी आणि परिस्थितीवर मात करून, येथील अक्षय टेंभुर्णीकर या युवा बाक्सिंग प्रशिक्षकाने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संघाला पदकं मिळवून देऊन गगनाला गवसणी घातली आहे. जालंधर (पंजाब) येथे फेब्रुवारी २0१७ मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेत अमरावती विद्यापीठाने तब्बल नऊ वर्षांनंतर कांस्य पदक मिळवले आहे. सध्याचे प्रशिक्षक पातूर येथील अक्षय परमानंद टेंभुर्णीकर यांची नेमणूक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने केली. जुलै १७ मध्ये महाराष्ट्राची टीम राष्ट्रीय स्पर्धेसाठी गुवाहाटी (आसाम) येथे अक्षय टेंभुर्णीकर यांच्या नेतृत्वाखाली गेली होती. ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिपसाठी ही बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा झाली. या महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक तथा प्रशिक्षक टेंभुर्णीकर होते. या स्पर्धेत महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर राहिला. संघाने दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य घेऊन हा संघ ऑगष्टमध्ये फिलिपाइन्स युरोप खंडात गेला. यामध्येसुद्धा एका खेळाडूला कांस्य पदक मिळाले. ज्युनिअर नॅशनल स्पर्धेसाठी प्रशिक्षकपदी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनकडून निवड करण्यात आली होती. अक्षय टेंभुर्णीकर या ३२ वर्षीय युवा कोचने इतिहास निर्माण करीत महाराष्ट्राला गौरव मिळवून दिला. अक्षय टेंभुर्णीकरची आर्थिक परिस्थिती मजबूत नसताना खेळासाठी नि:शुल्क आपले जीवन सर्मपित करून गरिबीत खितपत पडलेल्या मुला-मुलींच्या सुप्त गुणांना विकसित करून, त्यांना राष्ट्रीय स्तरापयर्ंत पोहोचवतात. स्वत: बेरोजगार राहून इतरांना नोकरीसाठी खेळाच्या दृष्टीने तयार करतात.अक्षयचं शिक्षण बीकॉम, बीपीएडपर्यंत झाले. बॉक्सिंग खेळाडू ते कोच असा प्रवास केला. ऑलिम्पिकसाठी खेळाडू तयार करण्याचे ध्येय त्यांनी निश्‍चित केले असून, त्यादृष्टीने ते परिश्रम घेत आहेत.  महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे ते ३ स्टार रेफरी आणि जज आहेत. २00८ पासून संघटनेच्या सोबत आहेत. सुवर्णपासून ते कांस्यपयर्ंत सहा ते सात पदकं राष्ट्रीय स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र संघाने मिळवले आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेत अमरावती विभागाला २५पेक्षा अधिक पदकं  त्यांनी मिळवून दिले आहेत. विद्यापीठाचा बेस्ट रेफरी अवॉर्ड आजतागायत अक्षयच्या नावावर कायम आहे. उत्कृष्ट मुष्टियोद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या यशाचे श्रेय अक्षयने आई आणि राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. सतीशचंद्र भट, प्रमोद सुरवाडे, बीएफआयचे महासचिव जय कवळी यांना दिले.

 शिर्ला येथे सुरू केली स्पोर्ट अँकॅडमी पातूरच्या शाळा, महाविद्यालयांनी सरावासाठी क्रीडांगण नाकारले. त्यामुळे त्यांना शिर्ला येथील सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अध्यक्ष सचिन कोकाटे यांनी शिर्लात क्रीडांगण उपलब्ध करून दिले. शिर्ला स्पोर्ट अँकॅडमीच्यावतीने विद्यार्थी ऑलिम्पिक स्तरावर नेण्याचा मानस अक्षयने व्यक्त केला.

टॅग्स :Sportsक्रीडा