शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2017 19:49 IST

अकोला:  जिल्हयातील गरीब रुग्णांच्याबाबतीत कुठल्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. आरोग्याच्या योजनेतंर्गत असणार्‍्या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ रुग्णांना प्राधान्याने दयावा, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांचे निर्देश आरोग्य विभागाचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:  जिल्हयातील गरीब रुग्णांच्याबाबतीत कुठल्याही प्रकारची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही. आरोग्याच्या योजनेतंर्गत असणार्‍्या सर्व प्रकारच्या सुविधांचा लाभ रुग्णांना प्राधान्याने दयावा, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांना केली.नियोजन भवनात बुधवारी आरोग्य विषयक सर्व समित्यांच्या आयोजित एकत्रित बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य विषयक समितीचे सभापती जमीर उल्ला खॉ पठाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदींसह तालुका आरोग्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली धडक मोहिमेतंर्गत रुग्णालये तपासणी जिल्हास्तरीय समिती, जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती, नियमित लसीकरण सक्षमीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय जंतनाशक मोहिम कार्यक्रम, अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रम, जिल्हास्तरीय लोकसंख्या धोरण समन्वय समिती,जिल्हा गुणवत्ता आश्‍वासन कार्यक्रम, कुष्ठरोग शोध अभियान, राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत असणारे कार्यक्रम, आशा कार्यक्रम, सिकल सेल कार्यक्रम, रुग्ण कल्याण समिती आदी विषयांचा सविस्तर आढावाघेण्यात आला. लसीकरण मोहिम ग्रामीण भाग विशेषत: शहरी भागात प्रभावीपणे राबवावी. अतिसार प्रभावित क्षेत्रात आरोग्य सुविधा दक्षतेने पुरवाव्यात. संभावीत पाणी टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर अतिसाराचा प्रसार होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. माता व बालमृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेत लाभ दयावा. आशा सेविकांची रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. सिकलसेलच्या रुग्णांची दक्षतेने तपासणी करा, असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी या बैठकीत दिले.

त्रुटींची पूर्तता न करणार्‍या रुग्णालयांवर कारवाईप्रारंभी रुग्णालय तपासणी धडक मोहिमेतंर्गत त्रुटी आढळलेल्या जिल्हयातील १00 रुग्णालयांना जारी केलेल्या नोटीसा व त्याला अनुसरुन केलेल्या त्रुटीची पुर्तता यावर चर्चा झाली. पिसीपीएनडीटीच्या कायदेविषयक सल्लागार अँड. शुभांगी खांडे यांनी त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांनी नोटीसीला अनुसरुन काय कारवाही केली याबाबत माहिती दिली.जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी  १५  मार्च २0१७ ते १९ मे २0१७  या कालावधीत त्यांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालये / दवाखाण्यांची तपासणी केली होती. तपासणीत त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांनानोटीस पाठविण्यात आल्या होत्या. यापैकी नोटीसा पाठविलेल्या अकोट येथील १८ पैकी १८ रुग्णालयांनी खुलासा दिला. बाळापूर येथील ४0 पैकी २६ रुग्णालय, मूर्तिजापूर येथील ८ पैकी ७  रुग्णालय, आणि अकोला ग्रामीण (सर्व तालुके) मधील ३४ पैकी १९ रुग्णालयांनी खुलासा दिला. ज्या रुग्णालयांनी त्रुटीची योग्यरित्या पूर्तता केलेली नाही अशा रुग्णालयांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.