शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

‘सवरेपचार’मध्ये रुग्णांचा भार नातेवाइकांच्या खांद्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:13 IST

पश्‍चिम विदर्भाचे ट्रॉमा केअर सेंटर असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या बुलडाणा, वाशिम जिल्हय़ातूनही दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयात सुविधांच्या अभावामुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाइकांचेही हाल होतात. रुग्णालयातील कर्मचार्‍यांकडून सहकार्य मिळत नसल्याने येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईकही हतबल होत असल्याचे चित्र दररोजच पाहावयास मिळते. 

ठळक मुद्देवॉर्डबॉय नावापुरतेच कर्मचार्‍यांच्या असहकार्याने रुग्णांचे नातेवाईक हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पश्‍चिम विदर्भाचे ट्रॉमा केअर सेंटर असलेल्या येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयात केवळ जिल्हाच नव्हे, तर लगतच्या बुलडाणा, वाशिम जिल्हय़ातूनही दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयात सुविधांच्या अभावामुळे रुग्णांसोबतच त्यांच्या नातेवाइकांचेही हाल होतात. रुग्णालयातील कर्मचार्‍यांकडून सहकार्य मिळत नसल्याने येथे उपचारासाठी येणार्‍या रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईकही हतबल होत असल्याचे चित्र दररोजच पाहावयास मिळते. रुग्णालयात दाखल गंभीर रुग्णांना अपघात कक्षातून किंवा वॉर्डमधून एक्सरे, सीटी स्कॅन करण्यासाठी हलवायचे असल्यास वॉर्डबॉय किंवा इतर कर्मचार्‍यांनी मदत करणे अपेक्षित आहे; परंतु येथे रुग्णांना हलविण्याचे काम नातेवाइकांनाच करावे लागते. वॉर्डांमध्ये कधी-कधी स्ट्रेचरही उपलब्ध नसते. त्यामुळे नातेवाइकांनाच रुग्णांना आधार देऊन किंवा उचलून न्यावे लागते. एवढेच नव्हे, तर काही कर्मचारी सेवारत असलेल्या डॉक्टरांनाही सहकार्य करीत नसल्याचे काही डॉक्टरांनी खासगीत बोलताना सांगितले. रुग्णालय प्रशासन मात्र याबाबत फारसे गंभीर नसल्याचे चित्र आहे.

रात्रपाळीला कर्मचार्‍यांची दांडीआंतरवासिता डॉक्टर व परिचारिका रुग्णांना बरे करण्यासाठी सतत परिश्रम घेतात; मात्र काही कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा व कामचुकारपणामुळे परिचारिकांवर ताण वाढविला आहे. रात्रपाळीत अटेन्डंट, कक्षसेवक, स्वीपर, सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे; मात्र महिनाभरातून क्वचितच हे कर्मचारी उपस्थित राहत असल्याच्या तक्रारी आहेत. या कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीत सर्वच कामाची धुरा परिचारिकांना सांभाळावी लागत आहे.

रिक्त पदांमुळे रुग्णसेवा बाधितसवरेपचार रुग्णालयात डॉक्टरपासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांपर्यंतची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या कर्मचार्‍यांवर रुग्णसेवेचा भार येऊन पडला आहे. रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे; परंतु ही पदे भरली जात नसल्यामुळे रुग्णसेवेचा खोळंबा होत आहे.

स्ट्रेचरवर बसतात हादरेअपघात कक्षापासून वॉर्डांकडे जाणारा रस्ता गुळगुळीत नसल्याने स्ट्रेचरला हादरे बसतात, तसेच या मार्गावर सावलीची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे भरउन्हात रुग्णांना स्ट्रेचरवर टाकून नेले जाते, त्यामुळे रुग्णांना त्रास होतो.