शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे सर्वोपचारमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांची कुचंबणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 16:21 IST

रुग्णांच्या नातेवाइकांची कुचंबणा झाली असून, त्यांच्यावर नाश्ता व जेवणासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

अकोला : राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २२ मार्च रोजी जमावबंदी कायदा लागू केला. या निर्णयामुळे सर्वोपचारमधील रुग्णांच्या नातेवाइकांची कुचंबणा झाली असून, त्यांच्यावर नाश्ता व जेवणासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. या प्रकाराची दखल घेत सोमवारी आमदार रणधीर सावरकर यांनी रुग्णांच्या नातेवाइकांच्या भेटी घेत या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती आहे.जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी जिल्हाभरातूनच नव्हे तर नजीकच्या वाशिम, बुलडाणा तसेच अमरावती जिल्ह्यातूनही रुग्ण दाखल होतात. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य सरकारकडून वारंवार दिशानिर्देश दिले जात आहेत. कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी २२ मार्चपासून १४४ कलमान्वये जमावबंदी कायदा लागू केला. परिणामी जीवनावश्यक वस्तूंसाठी किराणा,औषधीसह दुग्धजन्य पदार्थ विक्रीच्या व्यतिरिक्त इतर सर्व व्यवसाय बंद केले आहेत. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची मोठी कुचंबणा झाली आहे. परिसरातील सर्व हॉटेल, खाणावळी, ज्युस, चहा-नाश्त्याची दुकाने बंद असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. हा प्रकार समजताच सोमवारी आमदार रणधीर सावरकर यांनी सर्वोपचार रुग्णालय गाठून रुग्णांच्या नातेवाइकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या.जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चारुग्णालयात भरती रुग्णांसाठी सर्वोपचारकडूनच जेवणाची व्यवस्था केली जाते. अशावेळी त्यांचे नातेवाईक परिसरातील हॉटेल, खाणावळींमध्ये जेवण करतात. तूर्तास नातेवाइकांची गैरसोय होत असल्याने यावर उपाय काढण्यासाठी आ. सावरकर यांनी जिल्हाधिकाºयांसोबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान केवळ रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सर्वोपचार परिसरातील शिवभोजन योजना सुरू ठेवण्याची मागणी आ. सावरकर यांनी केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय