शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण नातेवाइकाकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 13:48 IST

नीलेश साबळे यांच्या डाव्या कानाला गंभीर दुखापत झाली असून, महेंद्र इंगोले नामक सुरक्षा रक्षकाच्या गळ््यालाही मार बसला.

अकोला : सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या जखमी महिलेला पती विनोद दामोदर याने रुग्णालयातच मारहाण केली. दरम्यान, पती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या सुरक्षा रक्षकावरच महिलेच्या पतीने मोटर सायकलच्या चावीने जबर वार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत सुरक्षा रक्षक नीलेश साबळे यांच्या डाव्या कानाला गंभीर दुखापत झाली असून, महेंद्र इंगोले नामक सुरक्षा रक्षकाच्या गळ््यालाही मार बसला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.सर्वोपचार रुग्णालयामध्ये अपघात कक्षात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास चौधरी सेवेवर असताना शुक्रवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास एक जखमी महिला त्यांच्याकडे आली. महिलेच्या डोळ््याजवळ झालेल्या जखमेतून रक्तस्राव सुरू असल्याने तिला उपचारासाठी ड्रेसिंगरुममध्ये पाठविण्यात आले. चौकशीदरम्यान डॉक्टरांनी महिला कॉन्स्टेबलच्या उपस्थितीत तिला जखमी झाल्याचे कारण विचारले असता, पतीने मारहाण केल्याची माहिती तिने सांगितली. थोड्याच वेळात महिलेचा पती विनोद दामोदर (रा. राजीव गांधी नगर ) हा ड्रेसिंगरुममध्ये आला व महिलेसोबत वाद घालत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. ड्रेसिंगरुममधून भांडणाचा आवाज आल्याने डॉ. विलास चौधरी यांनी सुरक्षा रक्षकाला बोलवत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला; पण हा वाद मिटवण्यासाठी आलेले सुरक्षा रक्षक नीलेश साबळे व महेंद्र इंगोले यांच्यावरच महिलेचा पती विनोद दामोदर याने हल्ला केला. यात त्याने मोटारसायकलच्या चावीने सुरक्षा रक्षक नीलेश साबळे यांच्या डाव्या कानावर वार केला. या घटनेत साबळे यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली, तर सुरक्षा रक्षक महेंद्र इंगोले यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, इतर सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी धाव घेत विनोद दामोदर याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी डॉ. चौधरी यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विनोद दामोदर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.डॉक्टरांवरील हल्ला थोडक्यात बचावलापती-पत्नीचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या डॉ. चौधरी यांच्यावरच महिलेच्या पतीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु सुरक्षा रक्षकांमुळे डॉक्टर थोडक्यात बचावले. या घटनेमुळे येथील डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. यापूर्वीदेखील येथे रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टरांमध्ये वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

 

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयAkolaअकोला