शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धोंडी नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 3, 2014 20:32 IST

धांेडी धोंडी पाणी दे.. ही प्रथाच आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सत्य समोर येत आहे.

अनिल दबडघाव * पाथर्डी : धांेडी धोंडी पाणी दे.. हलकी हलकी ज्वारी दे... असा सूर कानावर पडण्यासाठी गावकरी आतूर व्हायचे; परंतु ही प्रथाच आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सत्य समोर येत आहे. पावसाचे भाकीत करणारी यंत्रणा व हवामान खात्याचे पावसाचे अंदाज वर्तविणारी यंत्रणा सक्रिय असल्याने ग्रामीण भागातील ही धोंडी परंपरा संपली आहे. कधीकाळी गावात पावसाकरिता धोंडी काढली जायची. लाकडी काठीला कडूनिंबाचा पाला बांधून लहान मुले काठी आपल्या हातात धरायचे. त्याच्या मधोमध बेडकाचे पिल्लू बांधलेले व पुढे कुणीतरी डफडे वाजवत अनेक आबालवृद्ध शेतकर्‍यांसमवेत धोडींची गाणी गात वरुणराजाला प्रसन्न करीत. या धोंडीप्रमाणेच गावात कुणी कुठेतरी पानराजा बसवायचे. ज्याला काही शेतकरी पानदेव असेसुद्धा मानत. खोल खड्डा करून त्यात मोठा दगड ठेवल्या जायचा. त्याच्या सभोवताल पाणी टाकल्या जाई. त्यावर हळद, कुंकू टाकून त्याची पूजा-अर्चा करण्यात येत असे. तसेच त्या ठिकाणी रात्रभर वरुणराजाची गाणी म्हणत वरुणराजाला पावसाकरिता साकडे घालण्यात येत असे, तर शेतकरी धान्य गोळा करून भंडारासुद्धा देतअसे. त्याला शेतकरी पानदेवाचा भंडारा मानत असत; परंतु सद्य:स्थितीत या विज्ञानयुगात पावसाचे अंदाज, आराखडे सूचित करणारे यंत्र निर्माण झाल्यामुळे खेड्यापाड्यातील पावसाला प्रसन्न करण्याकरिता भोळ्या-भाबड्या श्रद्धेची धोंडी, पानराजा आता बासनात गंुडाळला आहे.