शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चाळण झालेल्या रस्त्यावरही पॅचिंग

By admin | Updated: January 23, 2016 01:50 IST

आयुक्तांनी उपटले ‘इन्स्टा पॅच’च्या प्रतिनिधीचे कान

अकोला: मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा कंत्राट घेणार्‍या ह्यइन्स्टा पॅचह्णनामक कंपनीने चक्क खड्डय़ांची चाळण झालेल्या रस्त्यावरही पॅचिंग केल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराची गंभीर दखल घेत मनपा आयुक्त अजय लहाने यांनी संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीचे कान उपटत देयकामध्ये कपात करण्याचे निर्देश बांधकाम विभागाला दिले आहेत.शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्यांच्या मधोमध भेगा पडल्या आहेत. प्रतिभा कन्स्ट्रक्शनने तयार केलेल्या सिमेंट रस्त्यांच्या मधातील भेगा वाढल्याने सदर रस्ते दुचाकी वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. यासोबतच काही ठरावीक डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यापूर्वी खड्डय़ांची पॅचिंग करताना निकषानुसार कामे न झाल्याने अवघ्या एक-दोन महिन्यातच सदर रस्त्यांची पुन्हा ऐसीतैशी झाल्याचे चित्र आहे. या बदल्यात लाखो रुपयांची देयके अदा करण्यात आली. देयके अदा करण्यापूर्वी पॅचिंगच्या कामांचा दर्जा तपासण्याची गरजही बांधकाम विभागाला भासली नाही, हे विशेष. या सर्व बाबी लक्षात घेता मनपा आयुक्त अजय लहाने यांनी खड्डय़ाच्या आकारानुसार पॅचिंगच्या कामाची निविदा जारी केली. ह्यइन्स्टा पॅचह्ण नामक कंपनीला वर्कऑर्डर देण्यात आली. खड्डय़ाचे मोजमाप करून प्रतिफुटाप्रमाणे पॅचिंग केल्यानंतर त्याचे देयक अदा करण्याची तरतूद आहे. यादरम्यान, ज्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे किंवा त्यावर नवीन रस्त्याची निर्मिती करण्याशिवाय पर्याय नाही, अशा रस्त्यावर सुध्दा ह्यइन्स्टा पॅचह्णच्या वतीने खड्डे बुजविण्यात आले. श्रीवास्तव चौक ते कस्तुरबा गांधी रुग्णालयासमोरील रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असताना या रस्त्यावर पॅचिंगची कामे करण्यात आली. अर्थातच, जेवढे खड्डे वाढतील, तेवढय़ा प्रमाणात देयकाची रक्कमदेखील वाढणार आहे. हा प्रकार मनपा आयुक्त अजय लहाने यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कंपनीच्या प्रतिनिधीची चांगलीच कानउघाडणी केली.