शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

 राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पास प्रणाली बारगळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:46 IST

अकोला: अकोल्यासह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पास प्रणाली सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही पास प्रणाली सुरळीत चालली; परंतु नंतर कागदच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत पास प्रणाली ठप्प करण्यात आली.

अकोला: अकोल्यासह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात पास प्रणाली सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही पास प्रणाली सुरळीत चालली; परंतु नंतर कागदच उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत पास प्रणाली ठप्प करण्यात आली. अकोला जीएमसीमध्ये ही प्रणाली नव्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र योग्य नियोजनाअभावी ही प्रणाली पुन्हा ठप्प पडली. त्यामुळे रुग्णालयात अस्वच्छता अन् रुग्णांच्या नातेवाइकांच्या वाढत्या गर्दीमुळे रुग्णसेवा प्रभावित होत आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांपेक्षा त्यांना भेटायला येणाऱ्या नातेवाइकांची गर्दी जास्त असते. यावर नियंत्रणासाठी शासनाने जून २०१८ पासून राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पास प्रणाली सुरू केली होती. शासकीय रुग्णालयांमध्ये होणाºया गर्दीवर नियंत्रणासाठी शासनाने हा निर्णय घेतला होता. त्यानुसार मोठ्या थाटात ही प्रणाली राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सुरू करण्यात आली होती; मात्र नियोजनाअभावी ही प्रणाली हळूहळू ठप्प पडली. या पास प्रणालीवर कुणाचेच नियंत्रण नसल्याने नागपूर, अकोला, यवतमाळसह सर्वत्रच ही पास प्रणाली ठप्प पडली आहे. मध्यंतरी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बारकोड असलेली अद्ययावत पास प्रणाली सुरू करण्यात आली होती; परंतु योग्य नियोजनाअभावी तीदेखील बारगळली. परिणामी, रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णसेवेवर प्रभाव पडला.यापूर्वी कागदांचा अभाव!शासनाच्या निर्देशानुसार पास प्रणाली सुरू करण्यात आली होती. तीन प्रकारच्या पासेस असून, त्याचे रंगही वेगवेगळे होते; परंतु रुग्णांना भेटायला येणाºया नातेवाइकांच्या तुलनेत पासेससाठी लागणाºया कागदांचा अभाव पडला होता.डॉक्टर अन् रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये वादाची शक्यता वाढली!पास प्रणाली बारगळल्याने शासकीय रुग्णालयात होणाºया गर्दीवरील नियंत्रण सुटले आहे. अपुरे मनुष्यबळ आणि ढासळलेल्या कारभारामुळे संतप्त रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.जुन्या पास प्रिंट होऊन आल्या आहेत. त्यामुळे जुनीच पास प्रणाली राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बारकोड पास प्रणालीचा सध्या उपयोग केला जात नाही. मनुष्यबळ अपुरे असल्याने काही समस्या येतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी सहकार्य करावे.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय