पातूर (जि. अकोला): पातूरहून अंबाशीकडे वेगात जाणार्या ऑटोरिक्षातून प्रवास करणार्या एका प्रवाशाचा रस्त्यात ऑटोरिक्षातून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार, ६ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. अंबाशी येथील मोहम्मद अय्युब याकुब पटेल (३५) हे पातूर येथून अंबाशीला जाण्यासाठी सोमवारी सायंकाळी एमएच ३0- एएफ -५६५३ क्रमांकाच्या ऑटोरिक्षात बसले होते. सदर ऑटोरिक्षा पातूरहून निघून अंबाशीकडे जात असताना पातूर पासून १ कि.मी.अंतरावर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मोहम्मद अय्युब हे ऑटोरिक्षातून खाली पडले. त्यामुळे गंभीर जखमी झाले. त्यांना पातूर पोलिसांनी तातडीने अकोल्यास सवरेपचार रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत पातूर पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती.
पातूरजवळ ऑटोरिक्षातून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू
By admin | Updated: April 7, 2015 02:03 IST