शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या सुरक्षेची गाडी ‘घसरलेली’

By admin | Updated: August 30, 2014 01:08 IST

अकोला रेल्वे स्थानकावरील ढासळलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे लोकमत स्टींग ऑपरेशनद्वारे घेतलेला वेध.

अकोला : रेल्वे स्थानक व गाडीत प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले रेल्वे पोलिस बलचे (आरपीएफ) अधिकारी-कर्मचारी कितपत जागरुक असतात, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न ह्यलोकमतह्ण चमूने गुरुवारी रात्रभर फिरून केला असता अतिशय धक्कादायक वास्तव उजेडात आले. बहुतांश सुरक्षा रक्षक झोपा काढत असल्याचे, यावेळी निदर्शनास आले. प्रवासी गाडी फलाटावर आल्यानंतर एखादा सुरक्षा रक्षक बुजगावण्यासारखा उभा राहतो, मात्र गाडीने फलाट सोडण्यापूर्वीच हा सुरक्षा रक्षक काढता पाय घेतो. फलाटावरील प्रथमश्रेणीच्या प्रतिक्षालयात कोणीही यावे, कुठेही झोपावे, उभ्या असलेल्या रेल्वेत कोणीही आक्षेपार्ह वस्तू ठेवाव्यात, फलाटावर कोणीही यावे अन् खाद्यपदार्थांंची विक्री करावी, अशी ह्यवाईटह्ण परिस्थिती सुरक्षा यंत्रणा झोपी गेल्याने पहावयास मिळाली. दररोज लाखो प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. नोकरी, व्यवसायानिमित्त रेल्वेने रोज जाणे-येणे करणार्‍या प्रवाशांची संख्याही कमी नाही. रात्रीच्या गाड्यांनी प्रवास करणार्‍यांमध्ये तर व्यापार्‍यांची संख्या जास्त असते. अकोला रेल्वे स्थानकावर रात्री १.३0 ते पहाटे ४ या दरम्यान प्रवासी गाडी थांबत नाही. गाडीच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी रात्री फलाटावरच झोपतात. प्रवाशांजवळ मौल्यवान साहित्य असते. यामध्ये व्यापारी प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे रात्री रेल्वे स्थानकावर रेल्वेची सुरक्षा यंत्रणा सर्तक राहणे आवश्यक असते. ह्यलोकमतह्ण चमूने गुरुवारी रात्री १ ते पहाटे ४ वा. पर्यंंत सर्वच फलाटांवर फेरफटका मारला. रात्री सेवाग्राम एक्स्प्रेस गेल्यानंतर रेल्वे पोलिस फोर्सचा (आरपीएफ) एक पोलिस फलाटावर आला. त्याने फेरफटका मारला आणि पाच ते सहा मिनिटात काढता पाय घेतला. त्याने ना एखाद्या संशयित इसमाची चौकशी केली ना बॅगची पाहणी केली. रात्री फलाट क्रमांक १ वर एक टोळके इतर प्रवासी झोपले असतानाही जोर-जोराने गप्पा करीत होते. या टोळक्याला हटकण्याची तसदीही या पोलिसाने घेतली नाही. एकूणच रेल्वे फलाटावरील परिस्थिती पाहिली तर, सुरक्षेसह संपूर्ण स्थानिक रेल्वे प्रशासनात ह्यशुद्धीकरण मोहीमह्ण राबविणे अत्यावश्यक आहे, यावर यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले. *रेल्वेत चोरट्यांच्या टोळ्याच सक्रिय..रेल्वेत प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंवर हातसाफ करणार्‍या टोळ्याच सक्रिय आहेत. या टोळ्या नाशिक ते नागपूर या रुटवर जास्त सक्रिय असतात. या टोळ्यांचे कंबरडे मोडण्यात ना आरपीएफ ना यश आले ना जीआरपीला (रेल्वे पोलिस स्टेशन). त्यामुळे रेल्वेत चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. *दक्षिण-मध्य रेल्वे स्थानकाची सुरक्षा वार्‍यावर दक्षिण-मध्य रेल्वेच्या अकोला रेल्वे स्थानकावर येणार्‍या प्रवासी गाड्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे हे रेल्वेस्थानक दुर्लक्षित आहे. परिणामी दक्षिण-मध्यच्या सर्व फलाटांवरील सुरक्षेबाबत विशेष खबरदारीही घेण्यात येत नाही. ह्यलोकमतह्णचमुने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान दक्षिण मध्य रेल्वेचा एकही सुरक्षा रक्षक गस्त घालताना दिसून आला नाही. फलाट क्रमांक ५ वर रात्रीच येऊन थांबलेल्या काचीगुडा एक्स्प्रेसच्या आरएमएस बोगीचे दार सताड उघडे होते. *प्रतीक्षालयात ह्यविश्रामह्ण कुणाचा?रेल्वे स्थानकावर पुरुष व महिलांकरिता स्वतंत्र प्रथम श्रेणी विश्रामगृह (प्रतिक्षालय)आहे. प्रथम श्रेणीने प्रवास करणार्‍या प्रवाशांव्यतिरिक्त इतर कुठल्याही व्यक्तीस आत प्रवेश करण्यास परवानगी नाही. स्त्री व पुरुष विश्रामगृहात येणार्‍या प्रत्येक प्रवाशाची नोंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्वतंत्र कर्मचारी नेमलेले आहेत. मात्र,ह्यलोकमतह्णचमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान स्त्री व पुरुष विश्रामगृहात रेल्वेचा एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. *सीसी कॅमेर्‍यांची नितांत गरजअनेक संशयास्पद व्यक्ती रात्रीच्या वेळेस अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर व परिसरात वावरताना आढळून येतात. रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागातील तिकीट खिडक्यांसमोर विश्राम करणार्‍यांची तुफान गर्दी असते. याच गर्दीत गाढ झोपलेल्या प्रवाशांच्या पाकिटांवर अनेक चोरटे नजर ठेवून असतात. फलाटांवरदेखील हीच स्थिती असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे स्थानकावर सीसी कॅमेर्‍यांची नितांत गरज आहे.