शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाशा पटेल यांनी घेतला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आढावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:00 IST

अकोला: महाराष्ट्र राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (राज्यमंत्री दर्जा) यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी मूल्य योजना, कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग येथे राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी पीक उत्पादन खर्च काढण्याची योजनेसंदर्भात आढावा बैठक घेतली.

अकोला: महाराष्ट्र राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (राज्यमंत्री दर्जा) यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी मूल्य योजना, कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभाग येथे राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणारी पीक उत्पादन खर्च काढण्याची योजनेसंदर्भात आढावा बैठक घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री कापूस सल्लागार समिती अंतर्गत महाराष्ट्रातील कापूस पिकाच्या समस्या, अडचणी, बाजारभाव व उद्योगातील संधी तथा इतर अनुषंगिक बाबतीत उपाययोजना जाणून घेतल्या. या कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या आढावा सभेला कृषी अर्थशास्त्र व सांख्यिकी विभागाचे प्रमुख डॉ. बी.एन. गणवीर, कृषी मूल्य योजनेचे क्षेत्र अधिकारी डॉ.ए.ए. भोपाळे, टेक्स्टाइल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोनोरे, सीसीआयचे उपाध्यक्ष भूपेंद्रसिंग राजपाल, कापूस उत्पादक कंपनी अध्यक्ष निलावार यांच्यासह राज्यातील प्रगतिशील शेतकरी व इतर प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी शेतकरी व व्यापारी वर्गाने एकत्रित प्रयत्नांनी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे अधिक विस्तृत करीत एक गाव एक पीक पद्धती सोबतच एक वाण पुरस्कार करावा आणि शेतीला अधिक आर्थिक फायदेशीर बनवावे, असे आवाहनसुद्धा पटेल यांनी यावेळी केले. तर गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लोकसहभाग, सलग्न शासकीय विभाग, विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नातून केलेले प्रयत्न व उद्दिष्टपूर्ती अधोरेखित करीत कृषी विद्यापीठ आणि इतर विभागांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज लक्षात घेऊन भविष्यात नियोजन केले असल्याचे आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले. याप्रसंगी उपस्थितांनी पटेल यांच्यासमोर आपले विचार मांडले व कापूस पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याचे आश्वस्त केले.याप्रसंगी पाशा पटेल यांनी विद्यापीठातील उद्यानविद्या विभाग, सेंद्रिय शेती प्रक्षेत्र, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विभागाला सदिच्छा भेटी दिल्या व संशोधनाचा, उपलब्धींचा आढावा घेतला, याप्रसंगी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्यासह विद्यापीठीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाPasha Patelपाशा पटेलDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ