शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेश घेताना पालक, विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यावी!

By admin | Updated: June 5, 2017 02:05 IST

प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिर: प्रवीण शिनगारे यांचे मार्गदर्शन, विद्यार्थी पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नीट परीक्षेचा निकाल लवकरच लागणार आहे. नीट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश घेण्यापूर्वी प्रवेश अर्ज काळजीपूर्वक भरावे लागणार आहेत. कॉलेज कोड टाकताना १ ते ९ पर्यंंतचे डिजिट विचारपूर्वक आणि लक्षपूर्वक भरावे. डिजिटमधील एकही आकडा चुकला तर एमबीबीएस प्रवेशापासून तुम्ही मुकला. मेहनत करूनही तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी अत्यंत दक्ष राहून स्वत:च्या आत्मविश्‍वासाच्या भरवशावर न राहता घरातील चार व्यक्तींना तरी भरलेला अर्ज दाखवावा, अशा शब्दांत राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी येथे मार्गदर्शन केले. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी प्रमिलाताई ओक सभागृहात नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते, या शिबिरात ते बोलत होते. विद्यार्थी व पालकांनी वैद्यकीय प्रवेश मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, डॉ. अपर्णा पाटील, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन केले. डॉ. शिनगारे यांनी राज्यातील १ लाख ३९ हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली असून, राज्यात ७५00 जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे, असे सांगत शिनगारे म्हणाले, की राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उत्कृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी सर्वच महाविद्यालयांना पसंती द्यावी; परंतु प्रवेश अर्ज भरताना एकदाच पक्का निर्णय घ्या, अर्ज भरताना खाडाखोड करू नका, पर्याय निवडताना अनेकजण जवळचे वैद्यकीय महाविद्यालय निवडतात; परंतु पालक व विद्यार्थ्यांंंनी प्रथम मुंबई, नागपूरचा विचार करावा. अर्ज भरताना सामूहिक निर्णय घ्या, कॉलेज कोडचे फोर डिजिट, कॉलेजला प्राधान्य देताना अर्ज लक्षपूर्वक भरा, डिजिटमधील एकही आकडा चुकला तर एमबीबीएस प्रवेशापासून तुम्ही मुकले असे समजा, असा सल्लाही डॉ. शिनगारे यांनी दिला. वैद्यकीय महाविद्यालयांमधील जागा, शुल्क याची माहिती घ्या. प्रवेश कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात मिळतो आहे, याला महत्त्व न देता प्रवेशाला महत्त्व द्यावे. माझ्या मते, ज्या कॉलेजमध्ये पदव्युत्तर जागा जास्त आहेत, ते कॉलेज चांगले, अशा शब्दांत शिनगारे यांनी मार्गदर्शन केले.