शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पणज-शहापूर पाटबंधारे प्रकल्प रखडलेलाच

By admin | Updated: November 7, 2014 23:11 IST

आकोट तालुक्यात पणज परिसरातील प्रकल्प.

पणज (आकोट, जि. अकोला): आकोट तालुक्यात पणज परिसरातील बोर्डी, चांभार व आड या नद्यांच्या तिहेरी संगमावर होत असलेल्या शहापूर लघुपाटबंधारे प्रकल्पाचे काम गत अनेक दिवसांपासून रखडले आहे. पणज परिसरात २00८ पासून शहापूर प्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी पणज, वडाळी देशमुख, शहापूर, वाघोडा या गावांतील अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. अजूनही प्रकल्पाकरिता आवश्यक असणार्‍या शेतजमिनीपैकी ३0 ते ३५ टक्के जमिनीची खरेदी प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे. प्रकल्प सुरू झाला तेव्हा ज्या भावाने शेतजमिनीच्या खरेदी करून घेण्यात आल्या, त्यापेक्षा आता पाच ते सहा पटींनी वाढले आहेत. सद्य:स्थितीत बाजारभावाप्रमाणे जमिनी खरेदी करून देण्यास तयार असल्याचे पत्र शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. तथापी, या प्रकल्पासाठी जमिनी देण्यास शेतकरी तयार नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. प्रकल्पाचे रखडलेले काम लवकर सुरू व्हावे, यासाठी शेतकर्‍यांनी २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण केले होते. दिवाळीनंतर कामाला सुरुवात होईल, असे यावेळी पटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी सांगितले होते. आता दिवाळीनंतर १0 ते १५ दिवस होऊन गेले तरीदेखील या शहापूर प्रकल्पाच्या कामाचा श्रीगणेशा झाला नाही. येथील बागायती शेती कोरडवाहू दर्शवून खरेदी करण्यात आली. कोरडवाहू दराने मोबदला देण्यात आला. एकरी दोन लाख ते ३ लाख ६0 हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आली. बागायती शेतीच्या दराप्रमाणे मोबदला मिळाला असता, तर दुप्पट पैसे हातात पडले असते, असा दावा शेतकर्‍यांनी केला आहे. शेतीचे मूल्यांकन २00९ मध्ये केल्यानंतर प्रत्यक्षात खरेदी मात्र २0११ मध्ये झाली. या दोन वर्षांत जमिनीचे दर वाढले; त्याचे मूल्यांकन झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या एक वर्षापासून या प्रकल्पाचे काम थंडबस्त्यात आहे. प्रकल्पाचे उर्वरित काम तातडीने सुरू करा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.