शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटासाठीचे ‘पॅनल’ आक्रमक

By admin | Updated: October 8, 2014 01:07 IST

अकोला जिल्हा कॉँग्रेसमध्ये होणार घमासान; निलंबित आजी-माजी पदाधिकारी येणार एकत्र.

अजय डांगे / अकोलाविधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी कॉँग्रेसमध्ये तयार झालेल्या ह्यपॅनलह्णमधील सदस्य आक्रमक झाले असून, निलंबनाच्या कारवाईनंतर आजी-माजी पदाधिकारी एकत्र येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे कॉँग्रेसमधील अंतर्गत वाद ऐन निवडणुकीच्या काळातच चव्हाट्यावर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यातील अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी कॉँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. या मतदारसंघातून एकूण १७ इच्छुक उमेदवारांचे अर्ज जिल्हा कॉँग्रेस कमिटी तर्फे प्रदेश कार्यालयात मुलाखतीसाठी पाठविण्यात आले होते. उमेदवारीसाठी झालेली रस्सीखेच लक्षात घेऊन पक्षात आजी-माजी पदाधिकार्‍यांनी स्थानिक पातळीवर ह्यपॅनलह्ण स्थापन केले होते. यामध्ये तीन नगरसेवकांचाही समावेश होता. पॅनलमध्ये अल्पसंख्याक, मराठा, ओबीसी समाजातील इच्छुक उमेदवारांचा समावेश होता. या पॅनलने प्रदेश पातळीवरील नेत्यांची भेट घेतली होती. पॅनलमधील कुणालाही उमेदवारी दिल्यास त्याला निवडून आणण्याची ग्वाही पॅनलमधील सदस्यांनी नेत्यांना दिली होती. या पॅनलने अकोला पश्‍चिम मतदारसंघात ठिकठिकाणी बैठकाही घेतल्या होत्या. बैठकांना पॅनलमधील सदस्यांचे सर्मथक उपस्थित असायचे; मात्र प्रत्यक्षात पॅनलमधील एकाही सदस्याला उमेदवारी मिळाली नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रचार केल्याचा ठपका ठेवत पक्षाने सोमवारी सहा नगरसेवक आणि चार आजी-माजी पदाधिकार्‍यांसह एकूण १0 जणांना निलंबित केल्याने पक्षात असंतोष उफाळून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निलंबित केलेल्यांमध्ये पॅनलमधील सदस्यांचाही समावेश आहे. * पॅनल घेणार कारवाईमागील ह्यहाताह्णचा शोध प्रदेश कॉँग्रेसने केलेल्या निलंबनाच्या कारवाईमागे कोणाचा हात आहे, याचा पॅनलकडून शोध घेण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे येणार्‍या काळात पक्षातील अंतर्गत वाद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या वादाचे पडसाद विधानसभा निवडणुकीत किती उमटणार किंवा उमटणार की नाही, हे येणार्‍या काळात स्पष्ट होईलच.