शहरं
Join us  
Trending Stories
1
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
4
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
5
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
6
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
7
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
8
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
9
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
10
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
11
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
12
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
13
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
14
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
15
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
16
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
17
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
18
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
19
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
20
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी

पंदेकृवि : अखेर उपोषणाची समाप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:48 IST

अकोला : ‘समान काम समान वेतन’ मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी कर्मचार्‍यांनी मागील पावणे दोन महिन्यांपासून पुकारलेले बेमुदत काम बंद आंदोलन व उपोषण अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आले.  राहणीमान भत्ता फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देऊन,समान वेतनाची मागणी शासन दरबारी रेटण्याचे आश्‍वासन कृषी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कर्मचार्‍यांना देण्यात आले. 

ठळक मुद्देकर्मचार्‍यांचे दोन महिने उपोषणराहणीमान भत्त्याची रक्कम मिळणार!

लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला : ‘समान काम समान वेतन’ मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या रोजंदारी कर्मचार्‍यांनी मागील पावणे दोन महिन्यांपासून पुकारलेले बेमुदत काम बंद आंदोलन व उपोषण अखेर शुक्रवारी मागे घेण्यात आले.  राहणीमान भत्ता फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी देऊन,समान वेतनाची मागणी शासन दरबारी रेटण्याचे आश्‍वासन कृषी विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने कर्मचार्‍यांना देण्यात आले.  खरीप हंगाम पूर्ण हातातून गेला आहे. आता रब्बी हंगामाचे दिवस आल्याने संपावर तोडगा काढण्यासाठीचे कृषी विद्यापीठ प्रशासनाचे प्रयत्न सुरू  होते.पावणे दोन महिन्यानंतर अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून,कुलसचिव डॉ. प्रकाश कडू यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर  ६ ऑक्टोबर रोजी कर्मचार्‍यांनी आंदोलन व उपोषण मागे घेतले. यासाठी कुलगुरू  डॉ.विलास भाले यांनी कर्मचार्‍यांची बाजू समजून घेतली होती व त्यांना राहणीमान भत्त्यांची रक्कम  दिवाळीपूर्वी देण्याचे आश्‍वासन दिले होते, तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. डी.एम.मानकर यांनीसुद्धा उपोषण मागे घेण्याकरिता कर्मचार्‍यांशी चर्चा केली होती. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सदर आंदोलन करण्यात आल्याने विद्यापीठाचे विविध प्रक्षेत्रावरील संशोधनात्मक कार्यावर तसेच बीजोत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. दरम्यान, कामगार संघटना प्रतिनिधी राजेश मुरुमकार, गौतम थोरात, प्रकाश सदांशिव यांनी विद्यापीठ प्रशासनास उपोषण मागे घेत असल्याचे लेखी कळवीत मागण्यांसंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. कुलसचिवांच्याहस्ते उपोषणकर्त्यांना लिंबू-पाणी पाजून उपोषणाची सांगता झाली. यावेळी कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी संजय कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके, बोदडे व इतरांनी सहकार्य केले, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते व त्यांच्या चमूने उपोषणकर्त्यांची वेळोवेळी तपासणी केली.

संपामुळे पिकांचे झाले नुकसान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे जवळपास ५ हजार एकर क्षेत्र असून, यातील साडेतीन हजार हेक्टरवर पिके घेतली जातात, शेतकर्‍यांना कृषी विद्यापीठाचे बियाणे उपलब्ध करू न देण्यासाठी  या प्रक्षेत्रावर विविध पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते;खरीप पिकांचा हंगाम सुरू  असताना कर्मचार्‍यांनी त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन सुरू  केल्याने कृषी विद्यापीठातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मूग,उडीद तसेच सोयाबीन पीक हातचे गेले असून, कापूस व तुरीचे पीकही गुरांनी फस्त करणे लावले आहे.