शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंदेकृविची राष्ट्रीय स्तरावरील रँकिंगमध्ये भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:14 IST

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीद्वारे जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९-२०१९ या कालावधीसाठी देशांतर्गत कृषी विद्यापीठांनी शिक्षण, संशोधन, विस्तार ...

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीद्वारे जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९-२०१९ या कालावधीसाठी देशांतर्गत कृषी विद्यापीठांनी शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य, विविध पुरस्कार, संशोधनात्मक लेख, वार्षिक बजेट, पदभरती, प्रायोजित प्रकल्प, आदींसह विविध विषयांवर केलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. गत वर्षी मानांकनातील उणिवा, त्रुटी, सादरीकरणाची पद्धती यावर सारासार विचार करीत कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी विद्यापीठ स्तरावर रँकिंग समिती स्थापन केली होती. विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. महेंद्र नागदेवे यांच्या अध्यक्षतेत स्थापन केलेले या समितीमध्ये प्रा डॉ. नितीन कोष्टी, प्रा. नितीन गुप्ता, प्रा.डॉ. अजय सदावर्ते, प्रा.डॉ. श्रीकांत ब्राह्मणकर, प्रा.डॉ. नीरज सातपुते, प्रा. डॉ. मंगेश मोहरील यांचा समावेश होता. विद्यापीठाचे आयसीएआर नोडल ऑफिसर डॉ. शशांक भराड सदस्य सचिव असलेल्या या समितीने संपूर्ण विद्यापीठ क्षेत्रातील कृषी महाविद्यालय, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, यासह विषयवार विभागांच्या तयारीचा ढाचा तयार केला होता. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा.डॉ. सुरेंद्र काळबांडे, विद्यापीठाचे संचालक संशोधन प्रा. डॉ. विलास खर्चे, संचालक विस्तार शिक्षण प्रा.डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता उद्यानविद्या प्रा.डॉ. प्रकाश नागरे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी प्रा.डॉ. सुधीर वडतकर यांच्यासह सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्रक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात अतिशय अल्प कालावधीत नियोजनबद्ध पद्धतीने कामगिरी बजावत हे उद्दिष्ट साध्य केले. या संपूर्ण प्रक्रियेत नोडल ऑफिसर प्रा.डॉ. शशांक भराड यांनी सर्वच स्तरावर निरंतर पाठपुरावा केला आणि त्यांचे कार्यालयातील सहकारी डॉ. अतुल वराडे, श्री. सचिन पाटील, यांनी सहकार्य केले. कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी या यशाबद्दल विद्यापीठ परिवारातील सर्व संचालक अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, कुलसचिव, वरिष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, प्रक्षेत्र अधिकारी,विद्यापीठ ग्रंथपाल, नियंत्रक, अभियंता, यांच्यासह सर्वच अधिकारी-कर्मचारी, कामगार, विद्यार्थी आदि सर्वांचे अभिनंदन केले आहे.