शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

घरांची पडझड, पीक नुकसानाचे पंचनामे सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 14:12 IST

जिल्हा प्रशासनामार्फत रविवारपासून जिल्ह्यातील घरांची पडझड आणि पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.

अकोला : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री धुवाधार पाऊस बरसला असून, तीन तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धुवाधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, पाऊस व पुराच्या तडाख्यात घरांची पडझड आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत रविवारपासून जिल्ह्यातील घरांची पडझड आणि पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.जिल्ह्यातील सातही तालुक्यांत शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस बरसला. त्यामध्ये बार्शीटाकळी, तेल्हारा व पातूर या तीन तालुक्यांमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस बरसल्याने या तीनही तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. धुवाधार पाऊस बरसल्याने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला असून, शेतात पावसाचे पाणी साचल्याने कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुरामुळे नदी-नाल्याकाठची शेतजमीनही खरडून गेली. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात घरांची पडझड झाली आहे. त्यानुषंगाने पाऊस आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील घरांची पडझड आणि पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत २२ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आले. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांद्वारे नुकसानाचे पंचनामे करण्यात येत असून, नुकसानाचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर तहसीलदारांकडून नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.अकोला तालुक्यात पाऊस आणि पुरामुळे घरांची पडझड आणि पिकांच्या नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार संबंधित तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांमार्फत पंचनामे करण्यात येत आहेत.-डॉ. नीलेश अपार,उपविभागीय अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग