अकोला: पैशाशिवाय सर्वसामान्य लोकांची कोणतीही कामे होत नसल्याचा आरोप करीत, पंचायत समिती सदस्य मंगेश काळे व त्यांच्या सर्मथकांनी मंगळवारी दुपारी अकोला पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले व तेथेच काही काळ ठिय्या दिला.अकोला पंचायत समितीमध्ये गोरगरिबांची कोणतीही कामे करण्यात येत नाहीत. सिंचन विहीर, घरकुल, शौचालय बांधकामाच्या अनुदानासह इतर कामांसाठी पैसे मागितले जातात. पैसे दिल्याशिवाय सर्वसामान्यांची कोणतीही कामे होत नाहीत, पंचायत समितीमध्ये अधिकारी वर्ग उपस्थित राहत नसल्याने विविध कामांसाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असा आरोप करीत, पंचायत समिती सदस्य राजेश काळे यांनी सर्मथकांसह मंगळवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास अकोला पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले आणि प्रवेशद्वारावरच ठिय्या दिला. सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले व खरपचे सरपंच प्रकाश रेड्डी यांनी मंगेश काळे यांची समजूत काढल्यानंतर अध्र्या तासानानंतर ४ वाजता पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराला लावण्यात आलेले कुलूप उघडण्यात आले.
पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराला सदस्याने ठोकले कुलूप!
By admin | Updated: June 8, 2016 02:21 IST