शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अकोट तालुक्यात पाणंद रस्ते चिखलमय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST

शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे आदींसाठी ...

शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक, तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे आदींसाठी शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असते; मात्र दीर्घ कालावधीनंतरही पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. चिखलमय रस्त्यावरून शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाले. निजामपूर-टाकळी बु. परिसरातील शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात जावे लागत आहे. निजामपूर येथे शेतात बैल गाडीत खते घेऊन जाताना चिखलात बैल गाडी फसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली. पाणंद रस्ते चिखलमय होत असल्याने शेतकऱ्यांना चिखलातून शेतात जाण्याची वेळ आली आहे. पाणंद रस्ते चिखलमुक्त करण्यासाठी शासनाने पुरेशा प्रमाणात निधी पुरवावा, पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद नसल्याने निजामपूर येथील शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

-----------------------------

गेल्या अनेक वर्षांपासून निजामपूर-टाकळी बु. शेतरस्त्यांबाबत अनेक वर्षांपासून गावातील नागरिक प्रशासन लोकप्रतिनिधींना वारंवार सांगून सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांचे या दुर्लक्षामुळे सकाळी एक शेतकरी बैल गाडीने शेतात खते घेऊन जात असताना चिखलमय शेतरस्त्यात फसली. शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला, तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन समस्या दूर करावी.

- प्रमोद की. बगाडे, शेतकरी, निजामपूर.