शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

पॅन कार्ड क्लब गुंतवणूकदारांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 02:55 IST

सेबीच्या कारवाईत अडकलेली कोट्यवधींची रक्कम काढण्यासाठी पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी रविवारी सकाळी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या ‘रामलता’ येथील जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने खा. धोत्रे यांना निवेदन देऊन गुंतवणूकदारांनी समस्या मांडल्यात. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांनी आंदोलकांना आश्‍वासन दिले. सेबीच्या कारवाईतून गुंतवणूकदारांची तातडीने मोकळीक करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले. 

ठळक मुद्देघंटानाद न करता खासदारांना दिले निवेदनसेबीच्या कारवाईत अडकली कोट्यवधींची रक्कम 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सेबीच्या कारवाईत अडकलेली कोट्यवधींची रक्कम काढण्यासाठी पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी रविवारी सकाळी अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या ‘रामलता’ येथील जनसंपर्क कार्यालयासमोर घंटानाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी परवानगी नाकारल्याने खा. धोत्रे यांना निवेदन देऊन गुंतवणूकदारांनी समस्या मांडल्यात. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांनी आंदोलकांना आश्‍वासन दिले. सेबीच्या कारवाईतून गुंतवणूकदारांची तातडीने मोकळीक करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन दिले. राज्यभरातील ४८ खासदारांच्या घर आणि कार्यालयासमोर  पॅन कार्ड क्लबच्या गुंतवणूकदारांनी हे आंदोलन केले. राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर को-ऑर्डिनेशन कमिटी आणि लढा वेल्फेर फाउंडेशनच्यावतीने अकोल्यात आंदोलन करण्यात आले.  लढा संघटनेचे अध्यक्ष अजय जहागीरदार यांनी शिष्टमंडळासमवेत खा. धोत्रे यांना निवेदन सादर केले. निवेदन देताना पॅन कार्ड क्लबचे मार्केटिंग सदस्य व्ही. बी.  वाकोडे ,डॉ. सुरेंद्र पावडे, डी. आर. जाधव , गणेश धुके, अविनाश देशमुख,  साहेबराव ठाकरे, व्ही. एच. पवार, पी.पी. उन्हाळे , दिनेश ठाकरे, एस. एम. जोशी, जे. जे. जव्हेरी, देवीदास पोटे, सपना अग्रवाल, नवलखे, मंदा वैराळे , कुलकर्णी, पी.पी. मुळे, एस. पी. शेगोकार, जी. एन. डांगे, आर. बी. पाटील, आर.एस. मुरकर, संतोष पिंजरकर, संजय वानखडे, एम.एम.  इस्माइल समवेत तेल्हारा, अकोट, मूर्तिजापूर, जळगाव जामोद व महानगरातील तब्बल दीडशे गुंतवणूकदार प्रामुख्याने उपस्थित होते.-