शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भूतदयेचा विसर...अकोल्यात भटक्या कुत्र्यांचा 'अघोरी' बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 10:34 IST

Akola News कुत्र्यांना मारहाण, कुत्र्यांच्या जबड्यात तार टोचून फरफटत नेणे अशा पद्धतीचा अवलंब करीत असल्याने प्राणीमित्रांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देजबड्यात तार टोचून त्याला फरफटत नेण्यात येत आहे.प्राणीमित्रांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

अकोला : शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, नागरिकांच्या नाकीनऊ आले आहेत. या समस्येसाठी मनपाकडून उपाययोजना केल्या जात आहेत; मात्र भटक्या कुत्र्यांना पकडण्याची पद्धत ही अघोरी स्वरूपाची दिसून येत आहे. मनपाचे कर्मचारी कुत्रे पकडताना कुत्र्यांना मारहाण, कुत्र्यांच्या जबड्यात तार टोचून फरफटत नेणे अशा पद्धतीचा अवलंब करीत असल्याने प्राणीमित्रांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

भटक्या कुत्र्यांचा हैदोस कमी करण्यासाठी महापालिकेकडून मोकाट कुत्रे पकडण्याच्या मोहीम राबविल्या जात आहे. कुत्र्यांना पकडण्याची पद्धत कमीत कमी वेदनादायी असावी, असे असतानाही मोहीम राबवताना मनपा कर्मचारी अत्यंत अघोरी स्वरूपाच्या पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे चित्र आहे. कुत्र्यांच्या जबड्यात तार टोचून त्याला फरफटत नेण्यात येत असल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. चुकीच्या पद्धतीमुळे प्राणीमित्रांमध्ये नाराजीचा सूर उमटत असून, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

गत पाच वर्षांच्या कालावधीत ७०० पेक्षा अधिक कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतरही शहरात समस्या कायमच असल्याचे दिसत आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या समस्येवर उपाय म्हणून कुत्रे पकडण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. मनपाने नियुक्त केलेल्या खासगी कंत्राटदारासहित चार कर्मचारी कुत्रे पकडतात. कुत्रे पकडण्यासाठी गेल्यानंतर कर्मचारी अघोरी पद्धत अवलंबवत असल्याने कुत्र्यांना इजा पोहोचत आहेत.

 

अशा व्यक्तींवर का कारवाई करू नये?

शहरात काही व्यक्ती विकृत आनंदासाठी कुत्र्यांना मारहाण करणे, त्यांचा छळ करतात. तसेच कुत्र्यांना पडकण्याची पद्धत कमीत कमी वेदनादायी असतानाही कर्मचारी कुत्र्यांचा अघोरी बंदोबस्त करतात. माणसाप्रमाणे प्राण्यांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कुत्र्यांना मारहाण करणाऱ्या व्यक्ती किंवा कुत्रे पकडताना चुकीची पद्धत अवलंबणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई का करू नये, असा सवाल प्राणीमित्रांमधून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाdogकुत्रा