शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पॅकेजच्या गायी वाटपात घोळ!

By admin | Updated: January 26, 2015 00:46 IST

सात वर्षांपासून चौकशी गुलदस्त्यात.

अकोला: विदर्भातील शेतकर्‍यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी विशेष पॅकेजअंतर्गत करण्यात आलेल्या गायी वाटपात प्रचंड घोळ झाला असून, अकोला जिल्हय़ातील या घोळाची चौकशी गत सात वर्षांपासून गुलदस्त्यात आहे.नापिकी, कर्जबाजारीपपणाला कंटाळून विदर्भातील शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्येचे हे सत्र गत सात वर्षांत प्रचंड वाढले. शेतकर्‍यांना आत्महत्येच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन केंद्र शासनाने पंतप्रधान, तर राज्य शासनाने विशेष मुख्यमंत्री पॅकेज दिले होते. केंद्र आणि राज्य मिळून जवळपास पावणे पाच हजार कोटींचे हे पॅकेज होते. या पॅकेजमुळे अल्पभूधारक शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यात आले होते. याशिवाय शेती विकासाच्या योजनांसह शेतकर्‍यांना जोडधंद्यांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. विदर्भ विकास पॅकेजांतर्गत विदर्भातील ११ जिल्हय़ात प्रत्येकी एक हजार गायींचे वाटप पन्नास टक्के अनुदानावर करण्यात आले होते; पण अनेक ठिकाणी या गायी कागदोपत्रीच वाटप करू न शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अकोला जिल्हय़ात हे वास्तव समोर आले आहे. या जिल्हय़ातील प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या सभासदांना एक हजार गायींचे वाटप करण्यात आले; परंतु यातील अनेक संस्थांनी कागदोपत्री गायी खरेदी केल्याचे भासवून अनुदानाची रक्कम हडप केल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. यासंदर्भात तत्कालीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी व साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (पदूम) अकोला यांनी संयुक्तरीत्या चौकशी करू न अहवाल दिला आहे. या अहवालात अकोला जिल्हय़ातील मूर्तिजापूर तालुक्यात सहा संस्थांच्या माध्यमातून ४१ गायी खरेदीच केल्या नसल्याचे चौकशीअंती आढळून आले आहे. तसेच बाश्रीटाकळी तालुक्यातील तीन सहकारी संस्थांच्या माध्यमातून २६ गायी, तेल्हारा तालुक्यातील एका संस्थेने नऊ गायी, तर आकोट तालुक्यातील एका संस्थेच्या पाच गायी खरेदीच केल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.याबाबत संबंधित कार्यालयाने शासनाला अहवाल पाठविला होता. ज्या संस्थांनी गैरविनियोग केला, त्या रकमेची वसुली करण्यासाठी संबंधित संस्थांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे चौकशी अहवालात चौकशी अधिकार्‍यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात अकोल्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी ८ फेब्रुवारी २00८ रोजी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी कार्यालयाला या गायी वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात सहकारी संस्थेचे विभागीय उप निबंधक सचिन घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विदर्भ विकास पॅकेजच्या गायी वाटपात अपहार झाल्याचे दोन चौकशी अहवाल प्राप्त झाले असल्याचे सांगीतले. परंतु या दोन्ही अहवालात प्रचंड तफावत असल्याने याची विशेष लेखा परीक्षकांकडून पुन्हा चौकशी करण्यासाठीचा पत्रव्यवहार केला असल्याचे सांगीतले.